तिजा तेरा रंग था मै जो।
काकोरी कटा नंतर गोऱ्यांमध्ये खळबळ माजली,कटात सामील असणाऱ्यांना पकडण्यासाठी स्कॉटलंड यार्ड म्हणून प्रसिद्ध असणारी आर्मी आणि सी.आय.डी. कामाला लावली,रामप्रसाद बिस्मिल,अश्फाक आणि क्रांतिकारी अंदरग्राऊंड झाले,एवढ्या धामधुमीत अश्फाक ची शायरी आणि बिस्मिल ची दाद! "अश्फाक,तुझ्या शायरी मूळ ह्या देशावर मेलो तरी परत जन्म घेईन"असं बिस्मिल अश्फाक ला कायम म्हणत असे,महिना होऊन गेला पण काकोरिच प्रकरण थंड होण्याचं नाव घेईना.हे अपेक्षित ही होतं,सर्व गोष्टींचा विचार करू न बिस्मिल अश्फाक ला म्हटला,"अश्फाक तू तुझ्या मायदेशी (अफगाणिस्तान) परत जा,थोड्या दिवस आपल्या माणसांबरोबर रहा,इकडं वातावरण निवळ्यावर तुला परत बोलावून घेऊ" हे ऐकून अश्फाक च्या डोळ्यात पाणी आलं,माझा दुसरा तिसरा देश कोणताच नाही,आणि तुम्ही माझे नाहीत का?मी माझ्या देशासाठीच लढतोय आणि त्यासाठीच कुर्बान होईल,माझ्या कुराणात पुनर्जन्म मानत नाहीत पण तरी भगवतगीतेनुसार जर पुन्हा जन्मलो तर भारतातच जन्म घेईन आणि ती प्रत्येक जन्म देशासाठी असेन" पंडित रामप्रसाद ज्याच्या तोंडात चोवीस तास देवाचं नाव आणि दुसरा अश्फाक ज्याने त्याची न...