तिजा तेरा रंग था मै जो।
काकोरी कटा नंतर गोऱ्यांमध्ये खळबळ माजली,कटात सामील असणाऱ्यांना पकडण्यासाठी स्कॉटलंड यार्ड म्हणून प्रसिद्ध असणारी आर्मी आणि सी.आय.डी. कामाला लावली,रामप्रसाद बिस्मिल,अश्फाक आणि क्रांतिकारी अंदरग्राऊंड झाले,एवढ्या धामधुमीत अश्फाक ची शायरी आणि बिस्मिल ची दाद! "अश्फाक,तुझ्या शायरी मूळ ह्या देशावर मेलो तरी परत जन्म घेईन"असं बिस्मिल अश्फाक ला कायम म्हणत असे,महिना होऊन गेला पण काकोरिच प्रकरण थंड होण्याचं नाव घेईना.हे अपेक्षित ही होतं,सर्व गोष्टींचा विचार करून बिस्मिल अश्फाक ला म्हटला,"अश्फाक तू तुझ्या मायदेशी (अफगाणिस्तान) परत जा,थोड्या दिवस आपल्या माणसांबरोबर रहा,इकडं वातावरण निवळ्यावर तुला परत बोलावून घेऊ" हे ऐकून अश्फाक च्या डोळ्यात पाणी आलं,माझा दुसरा तिसरा देश कोणताच नाही,आणि तुम्ही माझे नाहीत का?मी माझ्या देशासाठीच लढतोय आणि त्यासाठीच कुर्बान होईल,माझ्या कुराणात पुनर्जन्म मानत नाहीत पण तरी भगवतगीतेनुसार जर पुन्हा जन्मलो तर भारतातच जन्म घेईन आणि ती प्रत्येक जन्म देशासाठी असेन"
पंडित रामप्रसाद ज्याच्या तोंडात चोवीस तास देवाचं नाव आणि दुसरा अश्फाक ज्याने त्याची नामजाची एकही वेळ चुकवली नाही.पण त्यांची एकमकेवर असणारी अगाध मैत्री ही कुठेतरी इतिहास जमा झाली,जातानाही दोघे बरोबरच गेले.स्वातंत्र्य लढ्यात अनेक समाजातील जाती पातीतील लोक खांद्याला खांदा लावून लढले,मुस्लिम समाजाचे योगदान हे तेवढेच लाख मोलाचे!आज सत्तेत अशी माणसे बसलीत ज्यांच्या पूर्वजांनी स्वातंत्र्य संग्रामातील सहभाग आणि त्यावरची चर्चा ही वादग्रस्त आहे,आज त्यांच्या शाखेत भगसिंगांचे फोटो दिसतात,पण विचार मात्र दिसत नाहीत,राम मंदिराचा अट्टहास धरणारे भगतसिंग सारख्या नास्तिक माणसाला,किंवा अखंड हिंदुराष्ट्र संकल्पनेला विरोध करणाऱ्या माणसाला आपल्या पूज्य स्थानी कसे ठेऊ शकतात की हा फक्त त्यांच्या नावावर खपवलेला कुचकामी राष्ट्रवाद आहे.ज्यांनी हिंदुराष्ट्रवादाच्या पोकळ शपथा घेऊन सरकारी खाक्या दिसल्यावर माफीनामे आणि आर्जव केली,ज्यांनी खुद्द फितुरी करून अनेक क्रांतीकारकांना जेरबंद करण्यास मदत केली,ज्यात भगतसिंगांविरुद्ध दिलेली साक्षही आहे,आज तीच लोकं आपलयाला देशभक्ती शिकवताय हे नवल,त्यांना एकच सांगायचंय आज जर वरची तिन्ही महापुरुष जिवन्त असते तर ते नक्कीच आजच्या तरुणाई सोबत उभे असते.आज जेवढा हक्क हिंदूंना भारतात राहण्याचा आहे तेवढाच प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला न घाबरता मुक्तविचार करण्याचा आणि बोलण्याचा,राहण्याचा आहे.जो कोणीही ह्या देशाच्या सार्वभौमत्वा ला तडा देईन त्याला धडा शिकवल्या शिवाय भारतीय शांत बसणार नाहीत,इथून पुढे भारताला मी इंडिया,भारत,काहीही म्हणेन पण "हिंदुस्थान" म्हणून भारताच्या विविधतेत एकता असण्याच्या प्रतिमेला फक्त "हिंदू" पुरते अबाधित ठेवणार नाही. कारण मला भारताचा तिरंगा कायम फडकताना पाहायचा आहे,फक्त धर्मांधतेचा भगवा नाही.
सम्पवण्या आधी,अश्फाक जेव्हा फासावर जात होता,तेव्हा त्याच्या तोंडी ही शायरी होती.अगदी आजच्या परिस्थिती ला लागू होणारी
किये थे काम हमने भी जो कुछ भी हमसे बन पाये, ये बाते तब की हैं आजाद थे और था शबाब अपना।
मगर अब तो जो कुछ भी है उममीदे बस वो तुमसे है,जबां तुम हो लबे बाम आ चुका आफताब अपना।।
-विशाल यशवंत फटांगरे
#tathyamarathi #sindhusthan #CAB
Comments
Post a Comment