माणूस खरंच पृथ्वीवर उपरा आहे का?

संध्याकाळी खिडकीतून बाहेर डोकावताना मनात विचार येतो…. सकाळी होणारी चिमण्यांची चिव चिव, दुपारी झाडांच्या सावलीत पहुडलेले जनावरं,संध्याकाळी आकाशात भरारी घेणारे थवे दिसतात, आज फक्त माणूस घरात आहे.कारण बाहेरची दूषित हवा,आज पुन्हा एकदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हाच प्रश्न पुन्हा पडलाय कि खरंच मनुष्य इथलाच का? किंवा आपली उत्क्रांती आणि प्रगती इथेच झाली का?अगदी लहानपानपासून आपण वाचत आलो कि माणूस माकडापासून आणि हे माकड पाण्यातल्या अमिब्यापासून बनले आणि मग इतकी मोठी प्रगती करत करत आपण आज इतकी प्रगती केली कि कोरोनाच्या विळख्यात अडकून पडलो आणि पुन्हा एकदा आपल्या उत्क्रांती आणि प्रगतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. विशेष म्हणजे हा मानव प्रगतीचा चढता क्रमाचा आपण इतर प्राण्याच्या प्रगतीशी तुलना केली तर ती संशयी वाटते. म्हणजे आपण डायनासोर,मॅमथ असू देत किंवा इतर कोणतेही प्राणी पक्षी ज्यांमध्ये नैसर्गिक बदल होतं गेले म्हणजे डायनासोर वंशीय घोरपडी,सरडे,पाली हे प्राणी शारीरिक बदल होतं आज वेगळे आहेत पण त्यांची डायनासोर पूर्वजांची पिढी पूर्णपणे नाहीशी झाली, मॅमथ चा हत्ती झाला पण मॅमथ मात्र शिल्लक राहिला नाही, सांगायचं काय तर उत्क्रांती होतं असताना कोणत्याही प्राण्याची उत्क्रांतीपूर्वीचे वंशज नाहीसे झाले किंवा आवश्यक ते शारीरिक बदल झाल्याने पूर्वीचे रूप त्यांनी पूर्णपणे त्यागले,जर आपली उत्पत्ती पाण्यातून झाली तर पाण्यात पोहोण्याचे किंवा श्वास घेण्याचे गुण आपल्यात कसे नाहीत? आणि आपले आद्य-पूर्वज म्हणजेच मासे किंवा जलचर प्राण्याची प्रगती मानवाप्रमाणे का झाली नाही? ते तसेच का राहिले ह्याची उत्तर शोधणं कठीण आहे.किंवा माकडाला मानवांचा पूर्वज मानतो तर हा पूर्वज काही संख्येत आजही का आढळतो.किंवा आपल्याप्रमाणे त्याची शारीरिक किंवा बौद्धिक वाढ बदल का झाले नाहीत? हे उभे राहणारे सर्वात मोठे प्रश्नचिन्ह आहे. माणसानेही माकडाला आपला पूर्वज मानून एच आय व्ही सारख्या रोगांच्या टेस्ट किंवा प्रयोग माकडावर करण्यात आले पण तेथेही माणूस बऱ्याच अंशी अपयशी ठरला कारण हा विषाणू माकडाला आजिबात घातक ठरला नाही आणि तो बराही झाला पण मानवाला हा विषाणू किती घातक ठरू शकतो हे सर्वानाच माहीत आहे. त्यामुळे हे सिद्धच होते कि आपली रोगप्रतिकारक क्षमता असूद्यात किंवा गुणसूत्रे असूद्यात काहीअंशी माकडाशी जुळत जरी असली तरी ती तंतोतंत सारखी नाहीत.मानवाला पूर्वीपासूनच पृथ्वीवरच्या प्रत्येक बदलाला तोंड द्यावे लागले आहे पण पृथ्वीवरच्या इतर प्राण्यांना हे बदल स्वीकारताना मानवाइतका त्रास नक्कीच झाला नाही.
वरील पुस्तकानुसार मानवाच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीचा कालखंड आणि काळ लक्षात घेतल्यास तो नक्कीच मनात प्रश्नचिन्ह उत्पन्न करतो. पिरॅमिड हे नुसते दफन करण्यासाठीच्या वास्तू नसून त्यात सेल्फ चार्ज होणाऱ्या बॅटरीज होत्या आणि त्याचे कळस पूर्वी सोन्याचे होते जे कि सर्वोत्तम ऊर्जा किंवा वीज वाहक आहेत.किंवा मायन संस्कृतीत रेखाटली गेलेली भित्तिचित्रे किंवा शिल्पांमध्ये माणूस अनेकवेळा आकाशात उडताना किंवा यंत्र चालवताना आपल्याला दिसतो. जगात अनेक ठिकाणी असणारी क्रॉप सर्कल्स एवढी व्यस्थित आकारमानात कशी रेखाटली गेली किंवा त्याकाळी रेखाटले गेलेले नकाशे कसे काय रेखाटले गेले ह्याची उकल किंवा उत्तर आपल्याकडे नक्कीच नाहीत.पण मूळ मुद्दा हा नाहीच तर मानवाला इतर प्राणी पक्षांप्रमाणे वातावणाराशी जुळवून घेणे का जमत नाही? पृथ्वीवर बहुसंख्य जाती प्रजातीचे चित्र विचित्र जलचर उभयचर भूचर असे प्राणी आहेत प्रत्येकाची शरीररचना जरी वेगळी असली तरी वातावणारही जुळवून घेणे आणि राहण्याच्या,खाण्याच्या,जगण्याच्या सवयी मध्ये मात्र बरेचसे साम्य आढळते त्यात फक्त माणूस हा वेगळा पडतो, आपण प्राण्यांमधून माणसात विषाणू-जिवाणूंचे होणारे संक्रमण कायम बघतो पण परस्पर प्राण्यामध्ये होणारे रोगाचे संक्रमण हे खूप कमी आहे. आपल्यला अनेक प्राण्यापासून वेगवेगळ्या पद्धतीचा धोका आहे पण प्राण्यांना एकमेकांपासून नाही,पूर्वी भारतात महाराष्ट्रात प्लेग-देवीच्या साथीने असेच थैमान घातले होते,मुळात म्हणजे हा रोग माणसाशी जवळ जवळ सारखेच गुणसूत्र असणाऱ्या उदरांमुळे पसरला पण त्यात उंदरांना काहीही धोका नव्हता, त्यानंतर २००९ साली आलेल्या स्वाईन फ्लू जो डुकरांपासून माणसात आला त्यानेही मानवाचे मृत्यू झाले पण डुकरे शाबूत होती,तसा पोलिओ चा पण विषाणू इतर प्राण्यांवर काहीही परिणाम करू शकला नाही. मानवाच्या समजानुसार त्याला पटणारी स्वछता मग ती पाण्याची,हवेची किंवा घराची असू देत हि अनेक रोगांना टाळू शकते पण मानवाची स्वछ्तेची व्याख्या इतर प्राण्यांना कशी काय लागू होत नाही? ह्याचे उत्तरही आपल्याकडे नाही..! असो अशा अनेक आणि बऱ्याच गोष्टी किंवा उदाहरणे स्पष्ट करू शकतात कि आपण पृथीवरच्या इतर प्राण्यांप्रमाणे नक्कीच नाही.. आणि आपली उत्पत्तीही इथली नाही.मानव प्रगतीचा कालखंडाचा नीटसा विचार केल्यास कळते कि आपल्या पूर्वीच्या सभ्ह्यता आपल्या पेक्षाही अधिक प्रगत आणि तांत्रिक दृष्ट्या कुशल होत्या, आणि त्यांना अनेक शास्त्र, आणि समाजव्यस्थेचे ज्ञान हे नक्कीच कुणीतरी तिर्हाईताने दिले असावे. कदाचित ह्याच तिर्हाईताला पृथ्वीवर उतरण्यासाठी पूर्वजांनी जमिनीवर मोठमोठ्या आकृत्या आणि इंधन स्रोत म्हणून पिरॅमिड चा उपयोग केला गेला असावा. पण इतर प्राण्याच्या कालखंड इतक्याच काळात मानवाच्या बौद्धिक पातळीत झालेली आश्चर्यकारक वाढ हे त्याचेच उत्तर आहे.
कि हे ज्ञान आपण परिस्थितून नाही तर कुणाकडून तरी मिळवून शिकलो आहे.ईजिप्शियन संस्कृतीतील इमोहटेप हे त्याचेच सर्वात मोठे उदाहरण. ज्याला काळाच्या पुढचे ज्ञान होते.
एवढं सगळं होऊनही आज आपण वटवाघळापासून माणसात आलेल्या विषाणूचा सामना करतोय,पक्षी स्वछंद उडताय,प्रदूषित झालेलं आकाश निळंशार दिसतंय, इतर जनावरं, कुत्री मोकाट फिरताय,कदाचित सर्वच पृथ्वी त्यांच्या मालकी हक्क्काची असल्याची ग्वाही देताय जिथे आपण भाड्याने राहून मूळवासियांनाच भरपूर त्रास दिलाय.आज ओझोन चे आवरण पुन्हा एकदा पृथ्वीला सुरक्षित करतेय,हवाही पुन्हा एकदा निर्मळ झालीय, ती फक्त मानवासाठी दूषित आहे म्हणूनच आपण घर नावाच्या कृत्रिम ठोकळ्यात कैदी झालोत. मानवाने स्वतःला सर्वश्रेष्ठ समजण्याची भूल,आणि त्याच्या प्रगतीच्या व्याख्या किती बावळट आहेत हे सिद्ध होतंय.कदाचित आज सर्वच प्राणी मानवजातीवर नक्कीच हसत असतील आणि कारण राहण्याच्या,प्रगतीच्या,प्रकृतीशी जुळवून घेण्याच्या त्यांच्या व्याख्या अधिक योग्य आहेत असे मला वाटते, म्हणूनच आपण इथले नाही आहोत असे वारंवार वाटते कदाचित इतर प्राण्यावर मानवाने केलेल्या प्रयोगासारखं आपल्या वरही कुणीतरी प्रयोग करत तर नाहीना. चला हातातल्या सौंसर चा चहा सम्पला आपलीही मुदत संपल्यावर वरची saucer आपल्याला घेऊन जाईल किंवा नष्ट करेन, तोपर्यंत सर्व लॉकडाऊन झालेल्या व्यंतरवासियांना लेख वाचल्या बद्दल धन्यवाद..!
-विशाल यशवंत फटांगरे
#तथ्यमराठी #सिंधुस्थान #माणूस_पृथ्वीवर_उपराच. #लॉकडाऊन #व्यंतरवासी
शेअर आणि लाईक करायला विसरू नका
https://www.facebook.com/tathyamarathi/
Comments
Post a Comment