Posts

Showing posts from February, 2020

कदाचित "पराक्रमाला" "पुरुषार्थ" हा समानअर्थी शब्द नसता तर...

  थोड्याच दिवसांपूर्वी सर्व तरुण तरुणींनी जोरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला,अनेकांनी जन्मभर एकमेकांची साथ देण्याच्या आणाभाका घेतल्या,तर लग्न झालेल्यांनि कामातून वेळात वेळ काढून एकमेकांबरोबर वेळ घालवला,तर काहींनी मनातली गोष्ट आवडणाऱ्या माणसा समोर हिम्मत करून सांगितली,काहींचा प्रयत्न सफल झाला तर काहींचा प्रभानिरास, पण आजचा विषय हा ह्या भ्रमनिरास झलेल्यांसाठी. सध्या पुरोगामी महाराष्ट्र अलीकडच्या दोन तीन घटनांनी अगदी ढवळून निघाला, त्यावर नक्की कसे रिऍक्ट व्हावे हे ही कळेनासे झाले,पहिली घटना ती हिंगणघाटला एकतर्फी प्रेमातून झालेली,दुसरी प्रसिद्ध इंदोरीकर महाराजांनी केलेले वक्तव्य आणि त्यांना जनतेने केलेला विरोध किंवा सपोर्ट, आणि तिसरी म्हणजे व्हॅलेंटाईनच्या मुहूर्तावर मुलींच्या शाळेत मी कधीही प्रेमविवाह करणार नाही अशा घेण्यात आलेल्या शप्पता. ह्या तिन्ही घटना वेगवेगळ्या असल्या तरी त्यांची मुळं आपल्याला एकाच ठिकाणी आढळतात. आणि ती आपल्या पितृसत्ताक संस्कृतीत आणि पितृसत्ताक किंवा पुरुषांना महान ठरवून लिहिल्या गेलेल्या पुराण आणि भाकडकथा.ज्या कथा माणूस जेव्हा एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न करत...