कदाचित "पराक्रमाला" "पुरुषार्थ" हा समानअर्थी शब्द नसता तर...

 थोड्याच दिवसांपूर्वी सर्व तरुण तरुणींनी जोरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला,अनेकांनी जन्मभर एकमेकांची साथ देण्याच्या आणाभाका घेतल्या,तर लग्न झालेल्यांनि कामातून वेळात वेळ काढून एकमेकांबरोबर वेळ घालवला,तर काहींनी मनातली गोष्ट आवडणाऱ्या माणसा समोर हिम्मत करून सांगितली,काहींचा प्रयत्न सफल झाला तर काहींचा प्रभानिरास, पण आजचा विषय हा ह्या भ्रमनिरास झलेल्यांसाठी.

सध्या पुरोगामी महाराष्ट्र अलीकडच्या दोन तीन घटनांनी अगदी ढवळून निघाला, त्यावर नक्की कसे रिऍक्ट व्हावे हे ही कळेनासे झाले,पहिली घटना ती हिंगणघाटला एकतर्फी प्रेमातून झालेली,दुसरी प्रसिद्ध इंदोरीकर महाराजांनी केलेले वक्तव्य आणि त्यांना जनतेने केलेला विरोध किंवा सपोर्ट, आणि तिसरी म्हणजे व्हॅलेंटाईनच्या मुहूर्तावर मुलींच्या शाळेत मी कधीही प्रेमविवाह करणार नाही अशा घेण्यात आलेल्या शप्पता. ह्या तिन्ही घटना वेगवेगळ्या असल्या तरी त्यांची मुळं आपल्याला एकाच ठिकाणी आढळतात. आणि ती आपल्या पितृसत्ताक संस्कृतीत आणि पितृसत्ताक किंवा पुरुषांना महान ठरवून लिहिल्या गेलेल्या पुराण आणि भाकडकथा.ज्या कथा माणूस जेव्हा एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे पाय खेचण्याचे काम करतात.ते कसे?

*हिंगणघाट* ची घटना ही त्या तरुणीकडुन मिळालेला नकार पचवता न आल्याने झाली,मुळात आपल्यावर लहानपणा पासून पुरुषांवर स्त्रियांपेक्षा वेगळे संस्कार केले जातात त्याला कायम जिंकनेच शिकवले जाते किंवा रामाने,कृष्णाने,अर्जुनाने अशा अनेकांनी केलेला पुरुषार्थ त्याला सांगितला जातो, जिंकलेल्या व्यक्तींचे दाखले देऊन देऊन त्याच्या मनात आपसूकच एक उद्दामपणा आपण भरतो,ज्यामुळं नकार किंवा हार त्याला वय वाढते तसे मान्य करणे कठीण जाऊ लागते,पण पराभव कसा पाचववा,नकार हार कशी मान्य करावी हे कुणीच सांगत नाही,शाळेत पहिला आलाच पाहिजे किंवा प्रत्येक स्पर्धेत जिंकलेच पाहिजे असे बिंबवून बिंबवून आपण एक गर्विष्ठ उद्दाम *झोंबी* जन्माला घालतो ज्यात माणूस शिलककच रहात नाही.अशाच झोंबीकडून मग भविष्यात अशा घटना होतात ज्याचा आपन नंतर पश्चाताप करतो.
काळ बदलला तसे आपण बदलायला हवे हे आपल्याला समजलेच नाही,आज तरुण मुलं मुली बदलू पाहताय पण तेही आपण चुकीचे ठरवतोय,जर *मुलगा मुलगी समंजस असतील आणि स्वतःचा जोडीदार निवडू शकतात तर त्यात गैर काय आहे?* किंवा *मुलीने एखाद्या मुलाला मनातली इच्छा सांगितली* तर तिला आपण *चारित्र्यहीन* किंवा *वाया* गेलेली का समजतो?हा अलिखित हक्क मुलांना कुठून भेटलाय?किंवा *मुलीने नाही म्हटले तर तिला त्रास देण्याचा अधिकार मुलाला कुठून मिळालाय?* तो मिळाला नाही तर तो आपसूक संस्कारातून आलाय,आपल्या संस्कृतीत मनातली इच्छा सांगणारी *शूर्पणखेचे* नाक कापायचा अधिकार जसा कुणीही न सांगता लक्ष्मणाने घेतला तसाच आपल्यातील पुरुषानेही तो तिथूनच उचलला,आपल्याला का स्त्रीवर अत्याचार करणारा *लक्ष्मण हा देव आणि बहिणीवर अत्याचार करणार्यांचा बदला घेणारा रावण दैत्य वाटतो...* का दर वेळी *सीता आणि सती ने अग्निपरीक्षा द्यावी* त्यामुळं तर आपली मानसिकता स्त्री अत्याचाराची किंवा ऍसिड,पेट्रोल अटॅक ची तर झाली नाही ना? ह्याचा विचार करण्याची गरज आजच्या धर्मांध समाजाला नक्कीच करायला हवी, मुलींना शपता देण्यापेक्षा चांगला जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे हे जोपर्यंत शाळेतल्या तथाकथित नारोमाइंडेड मास्तरांच्या डोक्यात शिरणार नाही तो पर्यत मुलासमोर व्यक्त होणारी मुलगी शूर्पणकाच समजली जाईल,*कदाचित पराक्रमाला पुरुषार्थ हा समानअर्थी शब्द नसता तर लक्ष्मणाने ही शूर्पणखेच्या भावनांचा आदर केला असता आणि आजची पिढी नकार हार माघार पचवू शकली असती.*
शेवटी काय तर पहिल्यांदा ह्या *पोथ्या* *पुराणानांना* अवास्तव महत्व देऊ नका,तरच मुलांना खऱ्या पराक्रमाचा अर्थ कळेन आणि कोणते महाराज त्यातले दाखले देणार नाही.

-विशाल यशवंत फटांगरे
#तथ्य_मराठी #सिंधूस्थान

Comments

Popular posts from this blog

माणूस खरंच पृथ्वीवर उपरा आहे का?

तिजा तेरा रंग था मै जो।