Posts

Showing posts from July, 2020

आपले आदर्श जेव्हा हुकूमशाहीच्या हातातल्या कटपुतळ्या होतात तेव्हा...

Image
आज कोरोनाच्या महामारीत राहत असताना आणि स्वतःला वाचवत वाचवत आपण सर्व सामान्य ११३ वा दिवस पाहत आहोत, अगदी लोकडाऊन च्या आधीचे स्वात्यंत्र आपण एक सुखद आठवण म्हणून आठवतोय, जसा जसा काळ पुढे सरकतोय तस तसे नवीन आव्हानांना आपण सामोरं जातोय. सध्या तरी जगाची गोष्ट नको करायला किंवा पाकिस्तान किती घाबरलाय किंवा चीन किती मागे सरकलाय किंवा देशभक्तीचे पुरावे मी स्वतः देऊ इच्छित नाही..कारण जेव्हा आता सगळ्यांच्या जीवावर बेतू लागलंय तेव्हा ह्या गोष्टी वैयक्तिक मला तरी नगण्य वाटू लागल्यात,सर्वात पहिलं स्वसुरक्षा किंवा स्वसुख हा मानवी स्वभावच आहे त्यात गैर काही नाही.   सुरुवात झाली तेव्हा आपण बऱ्याच प्रमाणात हलक्यात घेतलं. आपलं तर जाऊद्याच पण सरकारने सुद्धा रोगाला हलक्यात घेण्यात आपली साथ दिली, हि लाट जाईलहि पण कोरोना काळात झालेले उत्सव नक्की लक्षात राहतील, सुरुवातीला टाळी थाळी वाजवणे नंतर दिवे लावणे नंतर टीव्हीवर रामायण महाभारत पाहून देवाचे नाव घेणे सर्वच झाले पण जस जशी भीषणता वाढू लागली तस तशी ह्या गोष्टी किती फोल होत्या हे जाणवू लागलेय, काहींनी हे उत्सव म्हणजे डॉक्टर पोलिसाना केलेले अभिनंदन आहे असे ...