आपले आदर्श जेव्हा हुकूमशाहीच्या हातातल्या कटपुतळ्या होतात तेव्हा...



आज कोरोनाच्या महामारीत राहत असताना आणि स्वतःला वाचवत वाचवत आपण सर्व सामान्य ११३ वा दिवस पाहत आहोत, अगदी लोकडाऊन च्या आधीचे स्वात्यंत्र आपण एक सुखद आठवण म्हणून आठवतोय, जसा जसा काळ पुढे सरकतोय तस तसे नवीन आव्हानांना आपण सामोरं जातोय. सध्या तरी जगाची गोष्ट नको करायला किंवा पाकिस्तान किती घाबरलाय किंवा चीन किती मागे सरकलाय किंवा देशभक्तीचे पुरावे मी स्वतः देऊ इच्छित नाही..कारण जेव्हा आता सगळ्यांच्या जीवावर बेतू लागलंय तेव्हा ह्या गोष्टी वैयक्तिक मला तरी नगण्य वाटू लागल्यात,सर्वात पहिलं स्वसुरक्षा किंवा स्वसुख हा मानवी स्वभावच आहे त्यात गैर काही नाही.
 

सुरुवात झाली तेव्हा आपण बऱ्याच प्रमाणात हलक्यात घेतलं. आपलं तर जाऊद्याच पण सरकारने सुद्धा रोगाला हलक्यात घेण्यात आपली साथ दिली, हि लाट जाईलहि पण कोरोना काळात झालेले उत्सव नक्की लक्षात राहतील, सुरुवातीला टाळी थाळी वाजवणे नंतर दिवे लावणे नंतर टीव्हीवर रामायण महाभारत पाहून देवाचे नाव घेणे सर्वच झाले पण जस जशी भीषणता वाढू लागली तस तशी ह्या गोष्टी किती फोल होत्या हे जाणवू लागलेय, काहींनी हे उत्सव म्हणजे डॉक्टर पोलिसाना केलेले अभिनंदन आहे असे घेतले तर काहींनी त्यात शास्त्र शोधून आपल्या महाशयांनी कसा कोरोना हवेत मारण्याचा मास्टरस्ट्रोक मारलाय हे पटवून पटवून सांगितले, नंतर बरेच लोक पायपिटीत मेले, आधी कुणाचे पगार कापू नका असे सांगणाऱ्या सरकारने पुन्हा एकदा पलटी मारली आणि सर्व हक्क कंपनी मालकाकडे सोपवले मग अनेकांच्या नोकऱ्या गेल्या,एकाबाजूला आपले उत्सव सुरु होते तर दुसऱ्या बाजूला हा रोग भीषण होत चालला होता, 

श्रीमंत किंवा मोठं मोठे सेलिब्रिटीज जे आपसूकच भारतीयांचे खूप मोठे आदर्श आहेत ह्यांनीही ह्या सर्व उत्सवांचा आणि महाशयांच्या चांगलाच पाठपुरावा आणि कौतुक केले, आणि सामन्यांवर ह्या गोष्टी बिंबत राहिल्या, भारतीयांना सद्सद्विवेक बुद्धीची कमतरता आहे असे मला राहून राहून वाटते कारण आपल्याला नेहमीच जगण्यासाठी कुणीतरी आदर्श व्यक्ती डोळ्यासमोर ठेऊन जगावे लागते आणि आतातर ती सवय होऊन गेलीय, आपण खूप पटकन एखाद्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो किंवा पटकन एकद्याला आदर्श बनवून त्याला देवत्व बहाल करतो, कदाचित काही स्थरापर्यंत ते ठीकहि आहे पण आज ह्याच गोष्टींचा आणि भावनांचा बाजार अनेकांनी केला, तरी आपली प्रामाणिकता आणि आदर्शवाद इतका पक्का झालाय कि आपले आदर्श कधी चुकूच शकत नाही हा ठामपणा आपल्यात येऊन आपल्या मेंदूचे रिमोट कंट्रोल आपण केव्हाच ह्या लोकांना बहाल केलाय, पण ह्याच भावनांचा बाजार आज भारतात भरलाय एका बाजूला त्यांच्यावर असणारी अंधश्रद्धा आपल्याला इतकी अंध बनवेल असं कधी वाटलंच नव्हतं, दिवसागणिक वाढणारे मृत्यू मग ते शहरातील असू देत शेजारचे असू देत किंवा घरातील व्यक्तींचे ते दिसत जरी असले तरी आपला आदर्शवाद ह्या मृत्याला नक्की जबाबदार कोण आहे? हे सत्य माहित असूनही त्यापासून दूर खेचतोय. आपण अनेक जणांचे जीव गमावतोय पण हे फक्त कोरोनामुळे नाही, तो तर फक्त निमित्त मात्र आहे, आपल्या डोळ्यावर आलेली झापड जी आपल्यला उघडायचीच नाहीये किंवा आपल्यलाला स्वतःला मान्य नाही कि इतक्या दिवस मी चुकीच्या व्यक्तीला आदर्श मानले कारण त्यामुळे कदाचित आपल्या स्वाभिमान दुखावेल आणि त्यासाठी आपण जवळच्या व्यक्तीच्या जीवाचा नकळत बळी द्यायला तयार झालोय. आपला आदर्श हा किती कुचकामी असू शकतो हे पावलो पावली कोरोना सिद्ध करतोय किंवा आपल्यलाला आरसाच दाखवतोय असं म्हणा... आपला आदर्श अयशस्वी आहे आणि सत्ता आणि आपल्या मनावर अधिराज्य कायम ठेवण्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करतोय त्या प्रयत्नात चीन येतो पाकिस्तान येतोय त्यांच्यावरचा विजय येतोय, शहिदांच्या नावावर मागितलेली भीकही येतेय पण कोरोना काही जास्त वेळ त्याला लोकांचे लक्ष दुसरीकडे खेचण्यात यशस्वी होऊ देत नाही, ह्याच आपल्या आदर्श व्यक्तीने काही बाहुल्याही पाळल्या आहेत आणि तो ह्या कट्पुतळीच्या प्रयोगांतून आपल्याशी बोलतो स्वतःच्या गौरवच्या पराक्रमाच्या कहाण्या त्यांच्या तोंडून वदवून घेतो त्याच कधी बातम्यांमधून आपल्याला दिसतात तर कधी सोशल मीडियावर किंवा अनेक माध्यमांमध्ये आपल्याला दिसतात. ज्याणेंकरून आपल्या शिष्यांवर आपला प्रभाव कायम राहील. *ह्या आदर्श व्यक्तीने धर्म,देशभक्ती,संस्कृती ह्याचा असा काही काढा त्याच्या शिष्याना पाजलाय कि त्याच काढ्याने आपण कोरोनमुक्तीही मिळवू शकतो असा त्यांचा ठाम विश्वास तयार झालाय*. पण जेव्हा त्यातील फोलपणा जाणवू लागला तेव्हा त्याने आयुर्वेद आणि योगाची कठपुतळी नाचवायला सुरुवात केली, त्यातूनच *कोरोनीलचा* जन्म झाला सुरुवातीला आयुर्वेदाचा आणि लगोलग भारतीय संस्कृतीचे दाखले देण्यात आले भारतीयांच्या आयुष्याचा पुन्हा एकदा बाजार झाला आणि ते औषध फोल आहे हे सिद्ध झाले, पण तरी आदर्श व्यक्तीच्या शिष्यानी विरोध करणाऱ्याला आयुर्वेदाचा-योगाचा विरोधक म्हणजेच देशाचा विरोधक असे ठरवले, *पण मुळात आयुर्वेद किंवा योग ह्यांना कुणीच विरोध केला नाही फक्त चुकीच्या औषधाला आणि रामदेव नावाच्या कट्पुटलीला तो विरोध होता, आणि आयुर्वेद किंवा योग म्हणजे फक्त "रामदेव" पुरती सीमित राहणारी व्याख्या किंवा इतके नगण्य नक्कीच नाही*.

आज ह्या आदर्श व्यक्तीच्या कटपुतळ्यांपैकी (अमिताभ आणि अनुपम खेर) दोन कठपुतळ्या ह्या रोगाने बाधित झाल्यात, आणि मुंबईतील चांगल्या रुग्णालयात त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबावर वैज्ञानिक रीतीने आणि डॉक्टरांकडून उपचार सुरु आहेत त्याचे नक्कीच तज्ज्ञ शिकलेल्या डॉक्टरांकडून उपचार होतील, पण ह्याच कटपुतळ्यांनी आदर्श व्यक्तीच्या टाळ्या थाळ्या, दिवे लावणे किंवा कोरोनील नावाचे औषध असू देत, सर्वांची तोंडभरून प्रशंसा केली होती आणि दिवे लावणे किंवा थाळ्या वाजवणे किती वैज्ञानिक आहे हे भाबड्या शिष्याना समजावून सांगितले होते पण आज जेव्हा वेळ आलीय तेव्हा त्यांना डॉक्टरच मदत करत आहेत किंवा विज्ञानच वाचवत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
असो... आज अनलॉक झालंय ते काही रोगाची भीषणता कमी झाली म्हणून नाही तर आपली आर्थिक स्थिती इतकी खालावली आहे कि तिच्या बदल्यात आपण जिवाशीही खेळायला तयार झालोत, पण ह्याची जबाबदारी हि आदर्श व्यकीतीची होती आणि राहील.. तो आपल्या कहाण्यांनी त्याची गौरवगाथा सांगतच राहील आणि अपयश झाकेन, अनेकांचे जीव जातील अनेक पोरके होतील, नोकऱ्या जातील,कर्जबाजारी होतील ,मानसिक रुग्ण होतील,कौटूंबिक छळाला बळी जातील पण हे सर्व होण्यापासून आपण थांबवू शकलो असतो, सकाळ नक्कीच होणार आहे पण मागे सरलेली काळ रात्र कुणीही विसरणार नाही, आणि पुन्हा नव्याने उगवलेला सूर्यही माझ्याच मुळे उगवला असा आदर्श व्यक्ती अगदी ठामपणे सांगेन आणि पुन्हा एकदा नवा कटपुतळ्यांचा खेळ सुरु होईल.

-विशाल यशवंत फटांगरे
#तथ्य_मराठी #आदर्शवाद. #covid-19 #coronavirus #corona #facemask #2020 #progress #truth

#social_distancing  #trade_war #sustainability


Comments

Popular posts from this blog

माणूस खरंच पृथ्वीवर उपरा आहे का?

तिजा तेरा रंग था मै जो।