दसऱ्याची आठवण
मागच्या दसऱ्याला माझ्या वकील मित्राने त्यादिवशी जिंकलेली केस सांगितली तीच सांगतोय... काही वर्षांपूर्वी वकिलाच्या एका मित्राने प्रेमविवाह केला,मुलगीही सुंदर सुशील चांगली होती त्यामुळं घरच्यांनीही लगेच होकार दिला पण लग्नाच्या संध्याकाळीच मुलीचे काही अज्ञातांनी अपहरण केले,मुली मुलाच्या घरचे अत्यंत चिंतेत होते,अपहरण करूनही खंडणी किंवा इतर काही मागणीचा साधा फोनही त्यांना आला नाही त्यामुळं प्रत्येकाच्या मनात एका वेगळ्याच भीतीने घर केले,संध्याकाळ पर्यंत कसे बसे मित्र वकिलाच्या सांगण्यावरून त्यांनी वाट पाहिली पण नंतर ते पोलिसात तक्रार करण्यासाठी गेले पोलिसांनी तक्रार फक्त लिहून घेतली आणि माहिती भेटल्यास सांगतो असं बोलून काम संपवलं,वकिलाला समजून चुकलं काहीतरी दिल्या घेतल्या शिवाय चौकशी पुढं सरकणार नाही,वकिलाचा मित्र प्रामाणिक असल्याने तो बरेच दिवस चौकीत खेटे घालत राहिला पण थंड पोलीस यंत्रणा झोपलेलीच राहिली शेवटी पैशाची तजबीज करून चौकशी सुरू केली.अचानक... एक दिवस वकिलाच्या मित्राचा मोबाईल वाजला आणि समोरून त्याची पत्नी बोलत होती,तिने जो प्रकार सांगितले ते ऐकून मित्राला धक्काच बसला,तिने सांग...