
संस्कृती : जी स्वतःची सर्वश्रेष्ठ आणि दुसऱ्यांची निंदनीय असते मध्यमवर्गीय माणूस, ह्या प्राण्याचे प्रमाण भारतात सर्वात जास्त, सर्वात जास्त टॅक्स भरणारा,सर्वात मोठी वोट बँक असणारा,सर्व नियम अटी लागू होणारा, सर्वात जास्त इज्जत प्यारी असणारा, सर्वात जास्त धार्मिक,भोळा भाबडा ज्याला वेळ येईल तसे देशातील सरकार किंवा श्रीमंत वरील कोणतीही गोष्ट लादून त्यांची कामे काढून घेतात, ह्या प्राण्याला आणि त्याच्या मुलं बाळांना सर्वच नियम लागू होतात अगदी कपडे घालण्यापासून, एवढे सगळे नियम असतानाही संस्कृतीचा फोल माज त्याचा काही उतरत नाही, आणि ती जपायची सर्वात मोठी मक्तेदारी ह्याने घेतलेली असते, त्यात राजकारणी,संघ संघटना धर्म जातीचं विष कालवून एखादवेळी दंगलीहि घडवून आणतात,ह्यात मारली जाणारी किंवा गुन्हे करणारी पोरही ह्यांचीच पण ह्यांना तो ह्यांची संस्कृती जपल्याचा एक पराक्रम वाटतो. जाऊद्या मूळ विषयाला हात घालू... लह...