Posts

Showing posts from January, 2020

"राज"कारण की "पवार"प्ले.

  कालच राज ठाकरेंच्या पक्षाचे नव्या झेंड्याचे अनावरण झाले,"हा भगवा पहिल्यापासून मनात होता पण लोकाग्रहास्तव मी झेंड्यात तीन रंग घेतले" अस राज साहेब कितीही म्हटले तरी ते न पटणारे आहे,त्यावेळेची पक्ष भूमिका ही शिवसेनेच्या हिंदुत्वा पेक्षा वेगळी असावी हे नक्कीच ठरले असणार कारण फक्त हिंदुत्वावर राज ठाकरेंना पक्ष उभे करणे अवघडच होते,त्यामुळेच बहूजन समाजाचा निळा,हिंदूंचा भगवा आणि मुस्लिम समाजाचा हिरवा त्यांनी झेंड्यात निवडला,त्याचा फायदा त्यांना नक्कीच झाला,आणि एकूण 40-45 आमदार त्यांनी निवडून आणले, दुर्दैवाने म्हणा किंवा डोक्यात हवा जाणे म्हणा ह्या आमदारांनी पाहीजे तसे काम काही केले नाही,त्यात मनसे चे सर्वाधिक लोकप्रिय गोल्ड मॅन रमेश वांजळे कालवश झाले,पण ह्या नंतर राज ठाकरेंनी अनेक सभा घेतल्या भाषणे केली पण तेव्हापासून आजतागायत पक्षाला काही जनतेचा कौल भेटला नाही, कालचे त्यांचे भाषण ऐकताना वारंवार जाणवत होते की मनसेने सध्याचे वातावरण पाहून जाणून बुजून हिंदुत्वाचा मुखवटा घालायचा प्रयत्न केलाय,वारंवार मुस्लिम समाजा बद्दलचा होणारा उल्लेख हा मुद्दाम केला जातोय किंवा बळेच आणलेले अवसान आ...

साईच्या नावानं मलाई

  लिहिण्याआधी सांगू इच्छितो की मला कुणाच्याही मनातील श्रद्धेला हिंनवायचे नाही. प्रगती ही अशी गोष्ट आहे की जी आपल्याला आहे त्या परिस्थितीतुन यशाकडे नेते,मग ती सामाजिक असो किंवा वैयक्तिक,समाजात वावरताना आपल्याला कधीतरीच सामाजिक प्रगतीचे ध्यान होते,एरवी आपण प्रत्येकजण वैयक्तिक स्वार्थ जपत स्वतःची नंतर घराची नंतर वेळ भेटलाच तर समाजाची प्रगती कशी होईल ह्याकडे लक्ष देतो,तशी संस्काररूपी शिकवण आपल्याला घरातूनच मिळते,आणि मोठं होत होत ते समज आणखी दृढ होत जातात,म्हण ूनच की काय मोठी माणसं फायद्या साठी सांम दाम दंड भेद सर्वांचा वापर करतात. स्वातंत्र्य मिळून आपल्या देशाला जवळ जवळ 70-72 वर्ष होत आली,आपल्या नंतर स्वातंत्र्य भेटलेले, जपान, जर्मनी सारखे अनेक देश आपल्या पेक्षा जास्त प्रगती करून केव्हाच पुढं निघून गेले,ह्याला नक्की कारण काय? तर फक्त स्वतःपुरता केलेला विचार आणि तोही चुकीच्या मार्गाने. मुळात आपल्या देशात उद्योग धंद्याला उत्पन्न कमी पण देवस्थानांचे इन्कम जास्त आणि त्यावर पोसले जाणारे लबाड लांडगे काहीही कष्ट किंवा ज्ञान न मिळवता पोसले गेले,ह्यालाही कारण एकच शिक्षण आणि ज्ञाना पेक्षा देवाला...