"राज"कारण की "पवार"प्ले.
कालच राज ठाकरेंच्या पक्षाचे नव्या झेंड्याचे अनावरण झाले,"हा भगवा पहिल्यापासून मनात होता पण लोकाग्रहास्तव मी झेंड्यात तीन रंग घेतले" अस राज साहेब कितीही म्हटले तरी ते न पटणारे आहे,त्यावेळेची पक्ष भूमिका ही शिवसेनेच्या हिंदुत्वा पेक्षा वेगळी असावी हे नक्कीच ठरले असणार कारण फक्त हिंदुत्वावर राज ठाकरेंना पक्ष उभे करणे अवघडच होते,त्यामुळेच बहूजन समाजाचा निळा,हिंदूंचा भगवा आणि मुस्लिम समाजाचा हिरवा त्यांनी झेंड्यात निवडला,त्याचा फायदा त्यांना नक्कीच झाला,आणि एकूण 40-45 आमदार त्यांनी निवडून आणले, दुर्दैवाने म्हणा किंवा डोक्यात हवा जाणे म्हणा ह्या आमदारांनी पाहीजे तसे काम काही केले नाही,त्यात मनसे चे सर्वाधिक लोकप्रिय गोल्ड मॅन रमेश वांजळे कालवश झाले,पण ह्या नंतर राज ठाकरेंनी अनेक सभा घेतल्या भाषणे केली पण तेव्हापासून आजतागायत पक्षाला काही जनतेचा कौल भेटला नाही,
कालचे त्यांचे भाषण ऐकताना वारंवार जाणवत होते की मनसेने सध्याचे वातावरण पाहून जाणून बुजून हिंदुत्वाचा मुखवटा घालायचा प्रयत्न केलाय,वारंवार मुस्लिम समाजा बद्दलचा होणारा उल्लेख हा मुद्दाम केला जातोय किंवा बळेच आणलेले अवसान आहे हे जाणवत होते,पण सद्यपरिस्तिती ओळखण्यास कदाचित मनसे पुन्हा एकदा चुकली असे वाटतेय,कारण मूळ CAA,NRC च्या नावाने उठलेले वादळ अजूनपर्यंत तरी महाराष्ट्रात म्हनावे तेव्हढे तीव्र नाही,अर्थातच त्यामुळं इतर राज्यात पडलेली सामाजिक दुफळी अजून तरी महरातष्ट्रात पडलेली नाही,त्यात उद्धव ठाकरेंनी जनतेला ह्या कायद्यापासून दिलेला दिलासा ही महत्वाची बाब,त्यामुळंच कदाचित बिजेपी सध्या CAA,NRC विषयी निपचित पडून आहे,आणि पंकजा मुंडेंच्या औरंगाबाद उपोषणात सहभागी होऊन फडणवीस पुन्हा स्वतः च्या पोळ्या भाजून घेताय.सध्यातरी सत्तेत असणाऱ्यांना विरोध करण्यासाठी त्यांना मुद्दा नाही.त्यात कालच पवार साहेबांनी भीमा कोरेगाव हे बीजेपी चे कारस्थान होते असा आरोप केलाय आणि पुन्हा एकदा बहुजन समाजाची बाजू घेतलीय,हा नक्कीच आघाडीला सेक्युलर म्हणून शिक्कामोर्तब व्हावा त्यासाठीचा प्रयत्न.
पण ह्या सर्वात एक लक्षात येते की एका बाजूला मनसेने उचललेला हिंदुत्वाचा विडा महाराष्ट्रात किती चालेल? कारण हाच मुद्दा घेऊन बिजेपी ने महाराष्ट्रातील जनतेला भुरळ घातली होती,पण प्रत्यक्षात मात्र हिंदू समाजातील मराठा मोर्चा,शेतकरी मोर्चा,पूरग्रस्त निधी,शिवाजी महाराजांच्या स्मारकात केलेला घोटाळा ह्या सर्व रुपात गाजर च हाती दिले.आणि तसे महाराष्ट्रातील जनता बर्यापैकी प्रॅक्टिकल असल्याने त्यांच्या जनादेश यात्रेला बऱ्याच ठिकाणी विरोध झाला,आता आलेले आघाडी सरकार म्हणजेच पवार साहेब ह्या सर्व गोष्टींना जाणून होते,सुरुवातीला हतबलता दाखवून नंतरची त्यांची मुसंडी सर्वांनीच पहिली,पण तीन वेगळ्या विचारधारा असणाऱ्या पक्षांना बांधून ठेवणेही तेवढेच कठीण,त्यात हिंदुत्व वादि शिवसेना भूमिकेवर थोडी नरमली आणि प्रबोधनकारानाच्या विचारांना पुढे नेण्याचा प्रयत्न करतेय हे दिसते,पण तरीही मतभेद हे भविष्यात होणारच.
त्याचाच बंदोबस्त कदाचित कालच्या सोहळ्यातून राज साहेबांनी केला,पवारांचे लाडके राज साहेब हे अचानक हिंदुत्वाच्या मुद्यावर तर येणार नाही,कदाचित शिवसेनेची भूमिका अनेकांना न पटणारी असेन म्हणून अशा जनतेला दुसरा हिंदुत्ववादी पक्ष तर हवा त्यासाठी हा खटाटोप,दुसरा ह्या साठी की आता पहिला हिंदुत्व वादी हा बीजेपी आणि आता दुसरा मनसे,आता बिजेपी चा धुर्तपणा हा सर्वांनीच पाहिलाय त्यामुळं ऐन निवडणुकीत खेळी करून जनतेची मने जिंकतील सांगता येत नाही...!अशा वेळी कोणीतरी स्पर्धक असेन तर नक्कीच मतांचे विभाजन होईल आणि पुन्हा एकदा आघाडीचे पारडे आपसूकच जड होईल,
पवार महाराष्ट्राला बिजेपीमुक्त करण्यासाठी पेटले आहेत आणि आज राज ठाकरे पुन्हा भगवा हाती घेऊन उभे राहिलेत,पुढची निवडणूकही अटीतटीची होणार,आघाडीने त्यांचे पर्व साध्य केले तर नक्कीच त्यांना मते मिळतील,राज ठाकरेंनी जागा आणल्याची तर त्यांना भवनात बसायचा मोका मिळेल आणि नाहीच मिळाल्या तरी बिजेपीचे मतं दुभगण्यात ते नक्की कामी येतील आणि "आघाडी"सुरक्षित राहील.आता ह्याचा अंदाज तेव्हाच येईल की मनसेच्या भगविकरन करण्यात आणखी कुणाचा हात होता का? "राज" कारण होते की "पवार"प्ले होता हे तेव्हाच कळेल.
-विशाल यशवंत फटांगरे
#tathyamarathi #maharashtra #sindhusthan
Comments
Post a Comment