साईच्या नावानं मलाई
लिहिण्याआधी सांगू इच्छितो की मला कुणाच्याही मनातील श्रद्धेला हिंनवायचे नाही.
प्रगती ही अशी गोष्ट आहे की जी आपल्याला आहे त्या परिस्थितीतुन यशाकडे नेते,मग ती सामाजिक असो किंवा वैयक्तिक,समाजात वावरताना आपल्याला कधीतरीच सामाजिक प्रगतीचे ध्यान होते,एरवी आपण प्रत्येकजण वैयक्तिक स्वार्थ जपत स्वतःची नंतर घराची नंतर वेळ भेटलाच तर समाजाची प्रगती कशी होईल ह्याकडे लक्ष देतो,तशी संस्काररूपी शिकवण आपल्याला घरातूनच मिळते,आणि मोठं होत होत ते समज आणखी दृढ होत जातात,म्हणूनच की काय मोठी माणसं फायद्या साठी सांम दाम दंड भेद सर्वांचा वापर करतात.
स्वातंत्र्य मिळून आपल्या देशाला जवळ जवळ 70-72 वर्ष होत आली,आपल्या नंतर स्वातंत्र्य भेटलेले, जपान, जर्मनी सारखे अनेक देश आपल्या पेक्षा जास्त प्रगती करून केव्हाच पुढं निघून गेले,ह्याला नक्की कारण काय? तर फक्त स्वतःपुरता केलेला विचार आणि तोही चुकीच्या मार्गाने.
मुळात आपल्या देशात उद्योग धंद्याला उत्पन्न कमी पण देवस्थानांचे इन्कम जास्त आणि त्यावर पोसले जाणारे लबाड लांडगे काहीही कष्ट किंवा ज्ञान न मिळवता पोसले गेले,ह्यालाही कारण एकच शिक्षण आणि ज्ञाना पेक्षा देवाला दिलेले अवास्तव महत्व आणि त्याचा मनाप्रमाणे केला जाणार वापर,जो सामान्य भारतीयनाच्या कधी लक्षात आला नाही किंवा येऊन देखील त्याकडं दुर्लक्ष केले,त्याचेच परिणाम आज आपण भोगत आहोत असे वाटते.
आता शिर्डीचाच वाद बघा,कोणीतरी साईबाबांचे जन्मस्थळ शोधून त्यांना आडनाव देऊन धर्म देऊन मोकळे झाले,मुळात मला खूप इच्छा आहे की साईबाबा,गजानन महाराज,स्वामी समर्थ ह्यांचे सामाजिक कार्य किंवा समाजासाठी केलेले लिखाण ,एखादा अभंग ओवी ऐकनायची.चमत्काराच्या मखमल लावलेल्या आणि नंतर तयार करण्यात आलेल्या एकाही चरित्रात मला रस नाही..असो हा मुळात वादाचा मुद्दा,आज शिर्डी,बालाजी,सिद्धिविनायक,शेगाव,त्र्यम्बकेशवर,काशी आणि अनेक अशी देवस्थाने आहेत की ज्याच्याकडे बेहिशेबी केंद्रित झालेली अशी मालमत्ता आहे की जिचे कोणालाही मोजमाप नाही किंवा ह्या संस्थानाना कोणताही कर भरावा लागत नाही.इतके घोटाळे भ्रष्टाचार होऊनही इथले स्वयंभू देव का कुणाला शिक्षा करत नाही हे विशेष! त्यावर पोट फुटे पर्यंत पैसा खाणारी या अनेक मंडळी एखाफ्या कष्टकऱ्यापेकशाही सुखी कशी काय हा प्रश्न ना आपल्याला पडतो ना बाबांना.. आज शिर्डीकरणांना साई बाबांचे नाही तर त्यांचे जन्मस्थान सापडल्याने आपला धंदा बुडेन ह्याची जास्त काळजी आहे,आणि पाथरीकरणा साईच्या नावाने मलाई खाण्याची इच्छा. पण हे वाद असेच होत राहतील.
ह्याआधी राम झाला,नंतर सबरीमला झाले,नंतर पुण्याच्या गणपतीचे गाऱ्हाणेही झाले...हा नसमपणार वाद हा जोपर्यंत शिक्षण ज्ञानाचं महत्व आपल्याला समजणार नाही तोपर्यंत असेच चालू राहील,आनि त्यावर होणार राजकार न,सामन्याचा कष्टाचा पैसा असाच दानपेटीत पडत राहील आणि त्यावर पोट फुटेपर्यंत रक्त पिणाऱ्या जळू सारखे धूर्त संस्थाने चिकटून राहतील.
कदाचित देव धर्मापेक्षा ज्ञान विज्ञानाची भारतीयांनी कास धरली असती तर आज शहरातही परदेशी कंपनीत नोकरी करण्यापेक्षा स्वदेशी कंपनीत नोकरी करून देशाला हातभार लावताना जास्त आनंद वाटला असता.
शेवटी "देऊळ" चित्रपटातला प्रभावळकरांचा तो डायलॉग आठवतो,"प्रगती व्हावी पण ती कोणत्या मार्गाने हे ही महत्वाचे..!"
-विशाल यशवंत फटांगरे
#tathyamarathi #sindhusthan #shirdi #saai
Comments
Post a Comment