साला एक मच्छर... (जागतिक मलेरिया दिवस २५ एप्रिल)
आज जागतिक मलेरिया दिवस, मलेरिया ची आणि त्याच्यावरच्या औषधाची सध्या भपूर चर्चा आहे, कोरोनावर प्रभावी उपचार म्हणून हे औषध अमेरिकेने भारताकडे हट्टाने मागितले, त्यामुळं मलेरिया ह्या रोगाचीही चर्चा पुन्हा एकदा झाली, काळ सहजच ह्याविषयी माहिती वाचताना काही आस्चर्यकारक गोष्टी वाचायला मिळाल्या, हा आजार डासांपासून होतो हे सर्वानाच माहीत आहे पण डास फक्त ह्या विशिष्ट जिवाणूंचे वाहक म्हणून काम करतात, विशेष म्हणजे हा आजार ख्रिस्त पूर्व काळाप ासून माणसाला त्रास देतोय त्यावेळी ह्या आजाराचे नाव फक्त वेगळे होते, नंतर जसजसे संशोधन झाले तसा उपायही मिळत गेला,एकेकाळी जागतिक गंभीर रोग बनलेला हा आजार आजच्या काळात तसा पहिला तर सामान्य आजार म्हणून आपल्याला ओळखीचा झालाय, पण तरी कुतूहलाची आणि गंभीर गोष्ट म्हणजे अजूनही जगभरात दरवर्षी ५१ कोटीच्या वर लोक ह्या आजराने प्रभावित होतात आणि ३० लाखांपर्यंत लोक स्वतःचा जीव गमावतात. भारतातही हा आजार तास कॉमन आहे आणि भारतातील नामांकित सिप्ला कंपनी ह्यावर मोठ्या प्रमाणात औषध उत्पादन करते,ख्वाजा अब्दुल हमीद ह्या गांधीवादी व्यक्तीने स्वात्यंत्र पूर्व काळात ह्या कंपनी...