साला एक मच्छर... (जागतिक मलेरिया दिवस २५ एप्रिल)
आज जागतिक मलेरिया दिवस, मलेरिया ची आणि त्याच्यावरच्या औषधाची सध्या भपूर चर्चा आहे, कोरोनावर प्रभावी उपचार म्हणून हे औषध अमेरिकेने भारताकडे हट्टाने मागितले, त्यामुळं मलेरिया ह्या रोगाचीही चर्चा पुन्हा एकदा झाली, काळ सहजच ह्याविषयी माहिती वाचताना काही आस्चर्यकारक गोष्टी वाचायला मिळाल्या, हा आजार डासांपासून होतो हे सर्वानाच माहीत आहे पण डास फक्त ह्या विशिष्ट जिवाणूंचे वाहक म्हणून काम करतात, विशेष म्हणजे हा आजार ख्रिस्त पूर्व काळापासून माणसाला त्रास देतोय त्यावेळी ह्या आजाराचे नाव फक्त वेगळे होते, नंतर जसजसे संशोधन झाले तसा उपायही मिळत गेला,एकेकाळी जागतिक गंभीर रोग बनलेला हा आजार आजच्या काळात तसा पहिला तर सामान्य आजार म्हणून आपल्याला ओळखीचा झालाय, पण तरी कुतूहलाची आणि गंभीर गोष्ट म्हणजे अजूनही जगभरात दरवर्षी ५१ कोटीच्या वर लोक ह्या आजराने प्रभावित होतात आणि ३० लाखांपर्यंत लोक स्वतःचा जीव गमावतात.
भारतातही हा आजार तास कॉमन आहे आणि भारतातील नामांकित सिप्ला कंपनी ह्यावर मोठ्या प्रमाणात औषध उत्पादन करते,ख्वाजा अब्दुल हमीद ह्या गांधीवादी व्यक्तीने स्वात्यंत्र पूर्व काळात ह्या कंपनी ची सुरुवात अवघ्या अडीच लाखात मुंबईत केली होती,आज ह्याच नामांकित कंपनीचे" hydroxychloroquine" नावाचे औषध कोरोनावर उपचार म्हणून आपले सरकार जगाला पुरवत आहे.
त्याकाळीही भारतीयांसह ब्रिटिशांनीही मलेरिया वर मात करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले त्यातीलच मुख्य आणि सफल प्रयत्न म्हणजे "गप्पी" मासे. आता ह्या गप्पी माशांचाही एक वेगळाच इतिहास आहे, आज हा मासा इतका कॉमन आहे कि तो कुठेही सापडतो पण ह्याला सापडवण्याचं श्रेय नक्की कुणाला द्यायचं ते आपल्याला माहित नाही... तर मिळेल ते खाणारे आणि पोटभरणारे हे मासे पाण्यातले डास हि सोडत नाहीत, त्यामुळं मलेरिया थांबवण्यात ह्यांचा महत्वाचा वाटा,पण ह्यांची मूळ जन्म भूमी "त्रिनिनाद" बेटावर आहे तिथून "रॉबर्ट जॉन लेशमीर गप्पी" ह्या ब्रिटिश शास्रज्ञाने त्यांना शोधून काढले म्हणूनच ह्या माशांचे नाव "गप्पी" पडले, मग ब्रिटिशांनी हे मासे भारताच्या अगदी गटारांपासून,नदी,नाले सगळीकडे पसरवले. नंतर ब्रिटिश गेले पण त्यांच्या काही चांगल्या योजना भारतसरकारने आहे तशा अंगिकारल्या आणि नेहेरुनी "मलेरिया" विषयी गाव,खेडे,पाडे अगदी सगळीकडे जनजागृतीची आणि औषध-सोयीची मोहीम आरोग्य कर्मचारी, जिल्हा प्रशाला, अंगण वाड्या,पंचायती,सरकारी दवाखाने अशा अनेक ठिकाणी केली, आज हा आजार जरी माणसाला होत असला पण आपला देश आणि यंत्रणा त्याला तोंड देण्यास तेवढीच सक्षम आहे, ह्याचे श्रेय अगदी गप्पी माशांपासून तर ब्रिटिश,डॉक्टर हमीद, त्यावेळची शासकीय यंत्रणा ह्यांना द्यायलाच हवे,
जिवाणू विषाणू मूळे होणारे आजार अगदी पहिल्यापासून मानवजातीवर उदभवले आहे आणि कालांतराने अतिशय नगण्य झाले, आज भयंकर वाटणारा कोरोना आपल्या मानवजातीवरचे नवीन संकट बनलाय पण जसे संशोधन होईल आणि उपाय सापडतील तसा हा हि आजार आणि त्यावरील उपचार सोपे होतील हे नक्की तोपर्यंत "घरात थांबणे" हेच सर्वात मोठे औषध.
जाण्याआधी "नाना पाटेकरांचेही" आभार कारण डास किती त्रास दायक असू शकतात हे त्यांनी अगदी सोप्या भाषेत समजून सांगितले. "साला एक मच्छर...... 😆"
-विशाल यशवंत फटांगरे
#तथ्य_मराठी #जागतिक_मलेरिया_दिन #दिनविशेष
Comments
Post a Comment