जोपर्यंत टीव्हीवर रंग गोऱ्याहोण्याच्या मलमाच्या जाहिराती दिसतील तोपर्यंत रोज एक फ्लॉइड मारला जाईल #icantbreathe

सध्या जगभरात # icantbreathe सोशल मीडियावर व्हायरल झालाय आणि सध्याच्या आणीबाणी च्या काळातही अमेरिकेत समाज रस्त्यावर उतरून तिथल्या पोलीस यंत्रणेविरुद्ध आंदोलन करत आहे, त्याचे मूळ कारण म्हणजे "जॉर्ज फ्लॉइड" नावाचा सामान्य व्यक्ती. *प्रकरण-* या घटनेची सुरुवात 20 डॉलरच्या बनावट नोटेच्या तक्रारीपासून झाली. 24 मे रोजी संध्याकाळी फ्लॉईड यांनी कप फूड्स दुकानातून सिगारेटचे पाकीट खरेदी केले. याच दिवशी संध्याकाळी तक्रार नोंदवली गेली. फ्लॉईड यांनी 20 डॉलरची बनावट नोट दिल्याच्या संशयावरुन दुकानातील कार्मचाऱ्याने पोलिसांकडे तक्रार केली. फ्लॉईड हे मूळचे टेक्सासमधील हस्टनमधील असून कामानिमित्ताने ते गेल्या काही वर्षांपासून मिनियापोलीस येथे स्थायिक झाले होते. इथे ते बाऊंसरचे काम करत होते. पण कोरोना व्हायरस आरोग्य संकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यात फ्लॉईड यांचीही नोकरी गेली. कप फूड्स दुकानात फ्लॉईड नेहमी येणारे ग्राहक होते. त्यांचा चेहरा ओळखीचा झाला होता. त्यांनी कधीच कुठलाही त्रास दिला नाही, अशी प्रतिक्रिया दुकानाचे मालक माईक अबूमयालेह यांनी एनबीसीशी बोलताना दिली. घटनेच्या दिवशी ते दुक...