खऱ्या देवाचा दृष्टांत
आज सर्व जग संसर्गजन्य रोगाच्या विळख्यात सापडले आहे,असा रोग की बाधित माणसाला मदत करायला जावं तर स्वतः इस्पितळात भरती व्हायची वेळ! पण हे आजचेच नाही तर पूर्वीपासून माणूस आशा अनेक रोंगातून गेलेला आहे,पूर्वी अगदी प्लेग,देवी,पोलिओ असे अनेक रोग असाध्य समजले जायचे पण जसं जसे तंत्रज्ञान, विज्ञान,वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झाली तस तसे हे असाध्य रोगही मानवापुढे नमले.पण वेळ येते जाते दुःखात संकटात माणूस असताना कसाबसा बाहेर निघतो पण धडा मात्र घेत नाही.
ह्या रोगांना विषाणू,जिवाणू जेवढे कारणीभूत आहेत तेव्हढेच माणसाचे अज्ञान किंवा अंधश्रद्धा ही.पूर्वी घरात ताप आला किंवा असे काही रोग व्हायचे तेव्हा आशा व्यक्तीला वार लागलं किंवा झपाटल असं समजून मांत्रिक तांत्रिक किंवा देवपुढं नेऊन टाकले जाई,व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर तो वाचायचा आणि देवाचा चमत्कार समजला जायचा आणि मेलाच तर त्याला देवाचा कोप.एवढ्या हुशार माणसाने भीतीपोटी हा विचार कधीच केला नाही की त्यांच्या अज्ञानामुळे कित्येक लोकांनी अंगारे धुपारे करून घरातले जवळचे माणसे त्यांच्या पासून हिरावून घेतले.हे प्लेग साथी ला पण झाले आणि बहुजन वर्ग त्या साथीत बळी पडला आणि त्यांना वाचवता वाचवता सावित्रीबाई मरण पावल्या.
असो ...आज काळ बदललाय विज्ञान वैद्यकीय शास्त्र प्रगत झालंय, ते प्रगत होताना किंवा करताना मानवाने निसर्गाची अवहेलना केली,प्रदूषण,लोकसंख्या वाढ आणि असे अनेक कारणे... आज कोरोनाने जगात थैमान घातले आहे,कित्येक बातम्या आशा आहेत की धर्मस्थळी लोक जमल्याने तिथूनही ह्या रोगाचा प्रसार झालाय,मला नवल ह्याचे आहे धर्मस्थळी असणारा निर्जीव मूर्ती किंवा थडगी आपल्याला ह्या पासून खरंच वाचवू शकतात का?तर नाही
आज आपण *बाबांना सोन्याचा मास्क,शनीला तेल देऊन कोरोनाची साडे साती, बालाजीला केस देऊन नवस बोललो किंवा थडग्या वर चादरी बहाल करून,होली वॉटर पिऊन हा रोग थांबणार नाही* त्याला उत्तर फक्त विज्ञान आहे आणि रुग्णांना बरे करणारे शिक्षित डॉक्टर ना की आशा परिस्थितितही तुमच्याकडून पैसे लाटणारे भटजी,भोंदू,बुवा.
*आज तुम्हाला भीती वाटते म्हणून कोणता देव पाठीशी उभा राहणार नाही आणि राहिलाच तर तो देव डॉक्टर असेन..*
-विशाल यशवंत फटांगरे
#तथ्य_मराठी #blog #corona #covid_19 #trending #marathi #news #updates #blogs
https://www.facebook.com/tathyamarathi/?modal=admin_todo_tour
Comments
Post a Comment