जोपर्यंत टीव्हीवर रंग गोऱ्याहोण्याच्या मलमाच्या जाहिराती दिसतील तोपर्यंत रोज एक फ्लॉइड मारला जाईल #icantbreathe


सध्या जगभरात #icantbreathe सोशल मीडियावर व्हायरल झालाय आणि सध्याच्या आणीबाणी च्या काळातही अमेरिकेत समाज रस्त्यावर उतरून तिथल्या पोलीस यंत्रणेविरुद्ध आंदोलन करत आहे, त्याचे मूळ कारण म्हणजे "जॉर्ज फ्लॉइड" नावाचा सामान्य व्यक्ती.

*प्रकरण-*
या घटनेची सुरुवात 20 डॉलरच्या बनावट नोटेच्या तक्रारीपासून झाली. 24 मे रोजी संध्याकाळी फ्लॉईड यांनी कप फूड्स दुकानातून सिगारेटचे पाकीट खरेदी केले. याच दिवशी संध्याकाळी तक्रार नोंदवली गेली.
फ्लॉईड यांनी 20 डॉलरची बनावट नोट दिल्याच्या संशयावरुन दुकानातील कार्मचाऱ्याने पोलिसांकडे तक्रार केली.
फ्लॉईड हे मूळचे टेक्सासमधील हस्टनमधील असून कामानिमित्ताने ते गेल्या काही वर्षांपासून मिनियापोलीस येथे स्थायिक झाले होते. इथे ते बाऊंसरचे काम करत होते. पण कोरोना व्हायरस आरोग्य संकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यात फ्लॉईड यांचीही नोकरी गेली.
कप फूड्स दुकानात फ्लॉईड नेहमी येणारे ग्राहक होते. त्यांचा चेहरा ओळखीचा झाला होता. त्यांनी कधीच कुठलाही त्रास दिला नाही, अशी प्रतिक्रिया दुकानाचे मालक माईक अबूमयालेह यांनी एनबीसीशी बोलताना दिली. घटनेच्या दिवशी ते दुकानात हजर नव्हते. संशायस्पद नोटेची तक्रार नोंदवताना दुकानाचा तरुण कर्मचारी केवळ नियमाचं पालन करत होता.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यादिवशी रात्री 8 वाजता 911 नंबरवर संपर्क करण्यात आला. दुकानदाराने सिगारेटचे पाकीट परत मागितले. पण फ्लॉईड यांना सिगारेटचे पाकीट परत द्यायचे नव्हते.
दुकानातील कर्मचाऱ्याने दिलेल्या साक्षीनुसार ग्राहक दारू प्यायलेला होता. तो स्वत:च्या नियंत्रणात नव्हता.
पोलिसांना संपर्क केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत दोन पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले. फ्लॉईड कोपऱ्यात पार्क केलेल्या कारमध्ये इतर दोन लोकांसोबत बसले होते.
पोलीस अधिकारी थॉमस लेन गाडीजवळ गेले. त्यांनी पिस्तूल बाहेर काढलं आणि फ्लॉईड यांच्या दिशेनं रोखून त्यांना हात वर करण्यास सांगितले. यावेळी पोलीस अधिकाऱ्यानं पिस्तूल का रोखली याचे स्पष्टीकरण अद्याप देण्यात आलेले नाही.
लेन यांनी फ्लॉईड यांना कारबाहेर ओढल्याचं फिर्यादीच्या वकिलांचं म्हणणं आहे. त्यानंतर बेड्या ठोकताना फ्लॉईड यांनी विरोध केल्याचंही वकिलांनी सांगितलं आहे.

"बनावट डॉलर दिल्याप्रकरणी फ्लॉईड यांना अटक केल्याची माहिती लेन यांनी दिली. बेड्या ठोकल्यानंतर फ्लॉईड यांनी सहकार्य केल्याचं लेन यांनी मान्य केलंय.

मात्र जेव्हा पोलीस अधिकारी फ्लॉईड यांना गाडीत न्यायला लागले तेव्हा संघर्षाला सुरुवात झाली.

अहवालानुसार, साधारण *सव्वा आठ वाजता फ्लॉईड जमिनीवर पडले*. आपल्याला *क्लॉस्ट्रोफोबिया* असल्याचं त्यांनी पोलीसांना सांगितलं.

तोपर्यंत शॉविन घटनास्थळी पोहचले. इतर पोलीसांच्या मदतीने त्यांनी फ्लॉईड यांना पोलीस गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला.

अहवालात दिलेल्या माहितीनुसार, 8 वाजून 19 मिनिटांनी शॉविन यांनी फ्लॉईड यांना गाडी बाहेर खेचले. ज्यामुळे ते जमिनीवर आदळले. ते तसेच खाली पडून होते. खाली पडलेले असताना त्यांचे हात तसेच बांधलेले होते.

*यावेळी प्रत्यक्षदर्शींनी व्हीडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली*. फ्लॉईड यांना प्रचंड त्रास होत असल्याचं या व्हिडिओत दिसून येतंय. ही दृश्यं अनेकांनी आपल्या मोबाईल फोनवर रेकॉर्ड केली. सोशल मीडियावरही व्हायरल केली. हा व्हीडिओ फ्लॉईड यांचा अखेरचा व्हीडिओ ठरला.
*फ्लॉईड यांना पोलिसांनी धरून ठेवलं होतं*, तर शॉविन यांनी आपला *डावा गुडघा फ्लॉईड* यांच्या *मानेवर* दाबून धरला होता.
*'मला श्वास घेता येत नाहीय*,' असं फ्लॉईड वारंवार पोलिसांना सांगत होते. विनवणी करत होते.
शॉविन यांनी तब्बल 8 मिनिटं 46 सेकंद फ्लॉईट यांची मान गुडघ्यानं दाबून धरल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय.
सहा मिनिटांनंतर फ्लॉईड यांच्याकडून प्रतिसाद बंद झाला. व्हीडिओमध्य फ्लॉईड अचानक शांत होऊन निपचित पडल्याचं दिसतंय. त्यानंतर तिथे जमलेल्या प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना त्यांची नाडी तपासण्यास सांगितलं.
कूएंग यांनी फ्लॉईड यांच्या उजव्या मनगटाची नस तपासली, पण ठोके सापडत नव्हते. तरीही अधिकाऱ्यांनी फ्लॉईड यांना सोडलं नाही.
8 वाजून 27 मिनिटांनी शॉविन यांनी फ्लॉईडच्या मानेवरुन गुडघा काढला. तोपर्यंत फ्लॉईड यांची हालचाल बंद झाली होती. त्यांना रुग्णवाहिकेतून हेनपिन काऊंटी वैद्यकीय केंद्रात नेले. त्यानंतर तासाभरानंतर फ्लॉईड यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.
फ्लॉईड यांच्या मृत्यूच्या आदल्याच दिवशी ते आपल्या जवळच्या मित्राशी फोनवर बोलले होते. क्रिस्टोफर हॅरीस यांनी त्यांना तात्पुरती नोकरी शोधण्याचा सल्ला दिला होता.
क्रिस्टोफर सांगतात, "फ्लॉईड बनावट चलन वापरणारा व्यक्ती नव्हता. त्याचे व्यक्तिमत्व तसे नव्हते."

प्रकरण वर्तमानातलं जरी असलं तरी अमेरिकेतील गोर्यांचा कृष्णवर्णीयांबद्दलचा राग हा फार पूर्वीपासूनचा आहे, त्यातून अगदी अमेरिकेचे कर्तृत्ववान अध्यक्ष बराक ओबामाही सुटले नाहीत, इतिहासातही काळा गोरा वाद हा मोठ्या प्रमाणावर वाचायला मिळतो अगदी मोठमोठ्या विचारवंतांपासून तर गायक,अभिनेत्यांनी सुद्धा ह्या विरोधात कायम आवाज उठवला,आस्ट्रेलियात तर हा वाद विकोपाला जाऊन कित्येक लोकांना प्राणही गमवावे लागलेत. इंग्रज भारतात असतानाही आपण काळे म्हणूनच ओळखले जायचो. पण तरीही लोकांच्या मनातला गौर रंगाविषयीचा हेवा मात्र कधीच कमी होताना दिसत नाही, एखाद्याचा रंग हा जन्मजात निसर्गाची देणगी म्हणून आलेला असतो पण आपण साधे बोलतानाही रंगात व्यंग शोधून काढतो, आपल्याकडे तर मुलींना लहानपानापासून गोरी दिसावी म्हणून काळजी घेणे उपाय करणे हे घरातूनच शिकवलं जात, ह्यात सर्वात मोठे गुन्हेगार पालकच आहेत कारण सर्वात पहिली स्ववर्णाच्या बाबतीत द्वेषाची भावना पालकच लहान मुलांत रुजवतात किंवा स्वतःचे मूळ गोरे असेंन तर सावळ्या किंवा कृष्ण वर्णियांबद्दलचा द्वेष आपोपापच पालकांच्या तोंडून ऐकून मुलांमध्ये आपसूकचं रुजतो. रंग भेद थांबव्याचा असेंन तर त्याची सुरुवात घरापासून होणे महत्वाचे आहे. जोपर्यंत रंगाकडे आपण तटस्थ म्हणून तोपर्यंत भविष्यातही रंगभेदावरून गुन्हे घडतच राहतील तुम्ही म्हणाल हा वाद आपल्याकडे कुठे दिसतोय, खरंतर हा वाद आपल्याकडे खूप आधीच विकोपाला गेलाय आपल्याकडे आदी कालपासून हा वाद जातीत विभागला गेला, टीव्हीत सूर-असुरांमध्ये विभागला गेला आज ह्या वादाने त्यापलीकडचे भयानक स्वरूप धारण करून आज त्याचे रूपांतर "मॉब लिंचिंग " सारख्या भयानक प्रकारात रूपांतर झाले. इंग्रजकडून स्वतःला काळे म्हणून इतके हिनवले गेले असूनही आपला गौर वर्णाचा अट्टाहास कमी होताना दिसला नाही. टीव्हीतल्या क्रीम्स च्या जाहिरातीतून किंवा घरगुती लेप तोंडाला फासताना तो प्रत्येकाकडून जपला जातो. पण आजच ह्याला आवर घातला नाही तर एकदिवस असाही येईल कि आपलेच कुणीतरी गुडघ्याखाली दाबून कुणाचा तरी जीव घेईल किंवा कुणाच्या तरी गुडघ्याखाली जीव दुरदैवाने जीव सोडेन!

-विशाल यशवन्त फटांगरे 
#तथ्य_मराठी #icantbreathe

Comments

Popular posts from this blog

माणूस खरंच पृथ्वीवर उपरा आहे का?

ll निःशेष ll