का ?
*का?* कालचा सर्वात मोठा पडलेला प्रश्न आणि त्याचे असंख्य अंदाज आणि उत्तर पण ह्या का? चे उत्तर सुशांत स्वतःबरोबर कायमचे घेऊन गेला,एक देखणा, हुशार हुरहुन्नरी तरुण उमेदीचा आणि तेवढाच संवेदनशील अभिनेता आपण सर्वानीच गमावला. त्याच जाणं प्रत्येकाला चटका लावून गेलं,जवळ जवळ प्रत्येकाच्या फेव्हरेट लिस्ट मध्ये सध्याच्या नवीन अभिनेत्यांपैकी तो नक्कीच होता, त्यामुळंच आपल्या सर्वांच्या मनात त्याच्याबद्दलचा हा का? अगदी ठळक उभा राहिला, पण ह्या का? च उत्तर शोधण्याची वेळ नक्कीच आली आहे. दुर्दैवाने, आत्महत्या आपल्या रोजच्या जीवनातील एक सामान्य गोष्ट होऊन गेली आहे,कारण आपण रोजच बातम्यांमध्ये अथवा आजूबाजूला आत्महत्याच्या गोष्टी ऐकतच असतो त्या गोष्टी इतक्यावेळा ऐकल्यात कि नकळत त्या आपल्या अंगवळणी पडल्यात,आपल्यातला प्रत्येकजण तिर्हाईताप्रमाणे हाच विचार करतो कि, जाऊद्या ना कुठं कोण आपल्या जवळचा होता...शोक करायला..! पण तुमच्या सर्वांच्या माहिती साठी सांगतो डब्लू एच ओ च्या २०१६ ला झालेल्या सर्वेक्षणानुसार दरवर्षी 793,000 लोक आत्महत्या करून जीवन संपवतात आणि विशेष गोष्ट म्हणजे त्यातील *पुरुषांचा आकडा हा सर्व...