का ?

 

*का?* कालचा सर्वात मोठा पडलेला प्रश्न आणि त्याचे असंख्य अंदाज आणि उत्तर पण ह्या का? चे उत्तर सुशांत स्वतःबरोबर कायमचे घेऊन गेला,एक देखणा, हुशार हुरहुन्नरी तरुण उमेदीचा आणि तेवढाच संवेदनशील अभिनेता आपण सर्वानीच गमावला. त्याच जाणं प्रत्येकाला चटका लावून गेलं,जवळ जवळ प्रत्येकाच्या फेव्हरेट लिस्ट मध्ये सध्याच्या नवीन अभिनेत्यांपैकी तो नक्कीच होता, त्यामुळंच आपल्या सर्वांच्या मनात त्याच्याबद्दलचा हा का? अगदी ठळक उभा राहिला, पण ह्या का? च उत्तर शोधण्याची वेळ नक्कीच आली आहे.

दुर्दैवाने, आत्महत्या आपल्या रोजच्या जीवनातील एक सामान्य गोष्ट होऊन गेली आहे,कारण आपण रोजच बातम्यांमध्ये अथवा आजूबाजूला आत्महत्याच्या गोष्टी ऐकतच असतो त्या गोष्टी इतक्यावेळा ऐकल्यात कि नकळत त्या आपल्या अंगवळणी पडल्यात,आपल्यातला प्रत्येकजण तिर्हाईताप्रमाणे हाच विचार करतो कि, जाऊद्या ना कुठं कोण आपल्या जवळचा होता...शोक करायला..! पण तुमच्या सर्वांच्या माहिती साठी सांगतो डब्लू एच ओ च्या २०१६ ला झालेल्या सर्वेक्षणानुसार दरवर्षी 793,000 लोक आत्महत्या करून जीवन संपवतात आणि विशेष गोष्ट म्हणजे त्यातील *पुरुषांचा आकडा हा सर्वाधिक आहे*.हीच ती धक्कादायक बाब..
कदाचित ह्याची कारणेही तशीच..अगदी साधा प्रश्न तुम्ही तुमच्या वडिलांना,भावाला,काकाला,मामला किंवा मित्राला मनापासून रडताना पाहिलंय,बहुतेक उत्तर कधीतरी पाहिलं असणार हेच आहे, आपल्या सिस्टमने अप्रत्यक्षपणे तो अधिकार अगदी लहानपणापासून पुरुषांमधून काढून घेतला,उदाहरणार्थ लहानपणी रडत असताना मोठ्यांच्या तोंडून आपसूकच "काय रे मुलींसारखा रडतो?" ऐकले असेंन, म्हणजे आपण त्याचवेळी त्याला आपोआपच भविष्यात येणाऱ्या कर्तव्यरूपी ओझ्याची जाणीव करून दिली... म्हणजे तुला असं रडून चालणार नाही तू मुलगा आहे पुढं जाऊन तुला अनेक गाडे ओढायचे आहेत त्यामुळं ह्या रडायच्या सवयी सोडून दे असाच त्याचा अर्थ.. पण हे करत असताना आपण त्याच्यातली संवदेनशीलता मारून टाकतो किंवा जरी असली तरी ती बाहेर दाखवायची नाही असा अलिखित नियमच घालतो,त्यामुळं जस जस मुलं मोठं होत जातं तशा त्याची इतरांकडे व्यक्त होण्याची सवयही सुटत जाते, त्यात अनेक जबाबदाऱ्या,टेन्शन्स आणि पैसे कमावण्याच्या रगाड्यात तो हरवून जातो.समाजाने तयार केलेली यशस्वी जीवनाच्या पठडीत तो पुरता अडकून जातो, म्हणजे चांगले मार्क्स मिळालेच पाहिजे, चांगले कॉलेज भेटलंच पाहिजे नंतर चांगली नोकरी लागलीच पाहिजे..आजकाल तर नोकरीवर ठरत लग्नाला मुलगी कशी मिळणार ते.. म्हणजे बघा ना एका बाजूला हुंडाविरोधी कायदा करून आपण मोकळे झालोत ते योग्यच आहे पण दुसऱ्या बाजूला ह्या गोष्टी आपण पुरुषांवर लादून मोकळे झालोत.. चांगले पॅकेज पाहिजे,चांगले घर पाहिजे,घरी शेती हवी पण फक्त हवी,शेतकरी नवरा नकोच.ह्या सर्व गोष्टींचा पिच्छा पुरवता पुरवता मुलाची अगदी दमछाक होते,त्याला कमी कालावधीत इतकं काही मिळवायचं असत कि अशा वेळी फिजिकल हेल्थ फक्त आजारी पडल्यावर सांभाळली जाते आणि मेंटल हेल्थ नावाची गोष्ट असते हे तो केव्हाच विसरलेला असतो. पूर्वी खळखळून हसणारा मुलगा वय वाढत जातं तस त्याच हसणंहि मोजकं होत, मनातल्या गोष्टी सांगाव्याशा वाटातातही पण पुढच्याला काय वाटेन, ते हसतील का किंवा माझ्या वैयक्तिक गोष्टी सांगतिल्यातर फायदा घेतील का असे अनेक प्रश्न...कुटुंबाची जबाबदारी, आर्थिक कर्ज किंवा चणचण, अचिव्हमेंट्स ह्या सर्वच गोष्टीत तो इतका हरवून जातो कि इतक्या थकल्या भागल्या शरीराला नंतर फक्त शांततेची गरज भासू लागते.पण हीच शांतता पुढे भयानक रूप घेते. पुरुष हा पेशाने अभिनेता असू देत किंवा शेतकरी त्याला इतक्या टोकाच्या भूमिका का घ्याव्याशा वाटतात? का तो महिलांप्रमाणे व्यक्त होऊ शकत नाही? ह्या "का" उत्तर कदाचित आपल्याकडेच आहे...
दुरदैवाने आशा प्रकारे जवळच्या माणसाला गमावण्याची वेळ कुणावरही येऊ शकते, जर असे होऊ नये आणि का? हा प्रश्न पडण्याआधी, प्रत्येकाने मनमोकळेपानाने व्यक्त होण्यास शिकले पाहिजे किंवा कोणतेही बंधन न आणता होऊ द्यायला हवं, जवळच्या माणसांची काळजी घेणं किंवा चौकशी करणं हे आपल्यासाठी सामान्य गोष्ट असेलही पण एखाद्याला ती धीर आणि उमेद देणारी असू शकते..त्यामुळं व्यक्त होणं ह्या पेक्षा मोठं मानसिक आरोग्यासाठी औषध नाही. पुरुष आत्महत्येची संख्या जास्त आहेच पण त्यातील सर्वात जास्त आत्महत्या करणारा वयोगट ४०-४५ च्या आतला आहे म्हणजे सुशांत सारखेच अनेक स्वप्न इच्छा आकांक्षा मनात बाळगणारे तरुण..

शेवटी एकच जगात स्वतःवर मनापासून सर्वात जास्त प्रेम करा, पहिल्यांदा तुम्ही स्वतःला स्वीकारा आणि जवळच्यांची काळजी घ्या, ह्या का?च उत्तर जाता जाता सुशांतच देऊन गेला, "जिंदगी मे कुछ जादा इम्पॉर्टन्ट हे तो वो हे खुद जिंदगी"

-विशाल यशवंत फटांगरे
#तथ्य_मराठी #RIP #sushant_singh_Rajput #Mental_Health#Mens_mental_health


Comments

Popular posts from this blog

माणूस खरंच पृथ्वीवर उपरा आहे का?

तिजा तेरा रंग था मै जो।