१० जून बॉल पॉईंट पेन दिवस

 आजच्या दिवसाचे महत्व हे ९० च्या दशकातल्या लोकांपेक्षा जास्त कुणीही सांगू शकत नाही, कारण बॉल पेन ने शाळेत असताना लिहिण्याची उत्सुकता आपल्यापेक्षा जास्त कुणालाच नव्हती.तसा तर बॉल पॉईंट पेनचा सॉरी आपण त्याला आपल्या भाषेतच बोलू "बॉल पेनचा" जन्म लैस्ज़लों बिरो ने १९३८ साली हंग्री ला केव्हाच केला होता पण आपला गृहपाठ आपण जवळ जवळ १९९९-२००० साली बॉल पेनने लिहू शकलो पण त्याच खापर आपण बिरोच्या डोक्यावर नाही फोडू शकणार कारण आपल्या प्रत्येकाच्या शाळेतले नियमच काहीसे तसे होते सुरुवातीला पाटी पेन्सिलवर ३री ४थी पर्यंत अक्षर वळणदार यावं म्हणून बाराखड्या गिरवल्या मग पाचवीत गेल्यावर वाटलंही कि आता मात्र आपण थोडे मोठे झालोत पण मग आपल्याला हाताची बोट कायम काळी निळी करणाऱ्या शाई पेन ला तोंड द्यावं लागलं हा पेन म्हणजे ऐनवेळी विश्वासघातकी मित्रा सारखा असे म्हणजे सुंदर अक्षरात गृहपाठ लिहिल्यावर शेवटी तो सहीवजा शाई चा मोठा डाग सोडून जाई किंवा ऐनवेळी त्याची शाई संपून जाई .आणि त्याला शाई भरायची वेगळीच कसरत असे मग हि शाई आपण २५ पैशात दुकानदाराकडून भरावी लागे. ह्या सगळ्याचा त्रास संपावा म्हणूनच आपण अगदी मनापासुंन बॉल पेनची वाट बघत होतो, आपल्यातील बऱ्याच जणांनी शाळेतल्या सर मॅडम चा बॉल पेन चा विरोध झुगारून त्याला वापरण्याचा प्रयत्न केला पण त्याबदल्यात हातावर सरळ पट्टीच्या छड्या खाऊन हि चळवळ तिथेच संपवावी लागली. हा जाचक नियम जवळ जवळ ७वी पर्यंत आपण निमूटपणे सहन केला. 

आणि तो दिवस उजाडला "बॉल पेन " वापरण्याची परवानगी शेवटी शाळेतून मिळते आणि मग हातात येतो चकचकीत निळ्या आरपार दिसणाऱ्या काचेचा आणि खालचा भाग पांढरा शुभ्र असणारा "रेनॉल्ड" चा पेन ह्या कदाचित आपल्यावेळी हाच पेन सर्वात रास्त दारात उपलब्ध होता त्यामुळे तो अगदी सहजच कोणाच्याही खिशाची शोभा वाढवत असे.ह्या पेनाने नुसती लिहिण्याची गरज भागवली नाही तर कधी चिंतेंत असताना कधी रागात असताना किंवा विचारात असताना ह्याच्या निळ्या टोपणनांला आपल्या दातांनी यथेच्छ चावून चावून भूकही भागवली. नंतर ह्या बॉलपेन ने अनेक रूपा ढंगात आपली साथ दिली कधी सुवासाची शाई बनून तर कधी एकाच पेनात रंगीत बदलणाऱ्या रिफीला बनून, त्यातल्या त्यात पेनात सुविचार असणारा आणि शाईच्या रंगासोबत ते बदलत जाणारा आसाराम बापूचा पेन म्हणजे अद्वितीय संशोधन वाटे, कधी युज अँड थ्रो वाला ऐनवेळी ५ रुपयांत मदतीस येणारा हा पेन एकेकाळी फक्त श्रीमंत लोकांच्या खिशाला परवडणारा होता पण नंतर तो इतक्या माफक दारात विकला गेला कि अगदी साबण निर्म्यावर फ्री मिळू लागला नंतर दिवस बदलले तसे शाई पेन ची जागा जशी बॉल पेनने घेतली तशीच बॉल पेनची जागा पॉइंटर पेनने (पायलट पेन ) आवतली, बॉलपेन पेक्षा जास्त सहज आणि एकदम सुरळीत शाई सोडणारा हा पेन प्रत्येकाच्या मनात जाऊन बसला मग हळू हळू बॉल पेन च युग माग पडत चाललं आताहि तो अगदी स्वस्त दारात मिळतो कधी बस मध्ये अहचानक ३० रुपयाला ५ पेन असा म्हणून विकला जातो तर कधी १० रुपयाला एकच मोठा पेन सिग्नल कुणीतरी अचानक आपल्यासमोर धरत.असो असा हा बॉल पेनने मनात मात्र त्याच्या आठवणी अगदी वॉटरपृफ इंकने लिहून ठेवल्या आहेत. पण सध्या online चा जमाना असल्याने हे सर्वच पेन फक्त टेबलची शोभा वाढवताय पण आपण इतके कॉम्पुटर च्या अधीन झालोत कि कधी कधी अचानक लिहिण्याची वेळ येते तेव्हा समजते आपण सुवाच्च हस्ताक्षर हे केव्हाच गमावून बसलोय, म्हणजे लहानपणची हस्ताक्षर खराब करायची चूक हि "बॉल पेनची " नव्हती तर आपलीच होती हे मात्र आता समजतंय, असो आज ह्याच बॉल पेनचा वाढदिवस, चला सर्वजण मिळून साजरा करू आणि निदान १० ओळी शुद्धलेखन तरी आजच्या दिवशी त्याने लिहू... धन्यवाद!
-विशाल यशवंत फटांगरे 
#तथ्य_मराठी #बॉल_पेन #दिनविशेष

Comments

Popular posts from this blog

माणूस खरंच पृथ्वीवर उपरा आहे का?

ll निःशेष ll