एक्सिट पोल की EVM मे झोल

 मतं दिली मतं गेली

बोट नुसतीच निळी झाली,
जनतेचा कौंल माती मोल,
जाहीर झाला एक्सिट पोल.

आरडून आरडून जनता थकली,
मीडियाने पुन्हा सरकारचीच चाटली,
केला जनतेचा कौल माती मोल,
जाहीर झाला एक्सिट पोल.

कार्यकर्ते नेते दमले सारे,
पुन्हा आले पोकळ वारे,
लाज वाटल्यास एकदातरी बोल,
खरं सांगा EVM मध्ये आहे ना झोल.
केला जनतेचा कौल माती मोल,
जाहीर झाला एक्सिट पोल.

भोग जुन्या पापाचे,
कुणी ना राहिले एका बापाचे,
आवाज घेतला आपलाच विकत,
पैशालाच तू सलाम बोल,
केला जनतेचा कौल माती मोल,
जाहीर झाला एक्सिट पोल.

यात्रा झाल्या झाले जनादेश,
खऱ्या जनांना ना राहिला देश,
ते पुन्हा येतील,ते पुन्हा येतील
पसरवायला आपल्यात जातिद्वेष,
आर...सोम्या आतातरी बोल,
केला जनतेचा कौल माती मोल,
जाहीर झाला एक्सिट पोल.

मतं आली मतं गेली,
बोटं नुस्तीचं निळी झाली.

-विशाल यशवंत फटांगरे
#tathyamarathi #politics #india #poem #maharashtra

Comments

Popular posts from this blog

माणूस खरंच पृथ्वीवर उपरा आहे का?

तिजा तेरा रंग था मै जो।