कृष्ण ….आवताराच्या आणि चमत्काराच्या विळख्यात अडकलेला कर्तृत्ववान चाणाक्ष महापुरुष

कृष्णाबद्दलच आकर्षण हे मला लहानपणापासूनच आम्ही लहान असताना कोणता देव भारी ते ठरवत असू त्याप्रमाणे रँकिंग मध्ये "ओम नमः शिवाय" मधून महादेव,रामयनातून "हनुमान",आणि महाभारतातून "कृष्णाचा"नंबर लागत असे.प्रत्येकजण स्वतःला आवडणाऱ्या देवाचा पहिला नंबर यावा म्हणून कसोशीने आपापल्या देवाचे प्लस पॉईंट सांगून प्रयत्न करी,बुमरवर येणाऱ्या wwf च्या पैलवणाच्या कार्डवर जसं लिहिलेलं असयाच अगदी तसंच,माझ्याही मनातला कृष्ण हा कालियाच्या डोक्यावर नाचणारा,गोपालांबरोबर मस्ती करणारा,कंसाला मारणार,डोक्यावर झुलणारं मोरपीस घेऊन राधे बरोबर झुलणारा,तर कधी सुदर्शन चक्राचा चमत्कार करून मुंडकी उडवणारा असाच होता दैवी चमत्काराने भारलेला निळा कृष्ण इतका मनात बसला होता की त्याचं खरं रूप,त्याची
विदवता,चाणाक्षपणा,गुण दैवीकरणाच्यामुळे दिसुच शकले नाही,*आज ह्याच कृष्णाला माणूस म्हणून शोधायचा प्रयत्न करू*...
कृष्णाच्या लढ्याला किंवा रोमांचकारी आयुष्याच्या प्रवासाला त्याच्या जन्मदिवसपासूनच सुरुवात झाली, कंसाचा मामा जरासंध ह्याने मथुरेचा राजा उग्रसेनाला हरवून मथुरा कंसाच्या ताब्यात दिली, त्याचवेळी कंसाने कृष्णच्या जन्मदात्या आई वडिलांना तुरुंगात डाम्बवुन त्यांची सात मुलं मारली आठवा कृष्ण वासुदेवामुळे गोकुळात पोहोचला, कृष्णाचा जन्म तसा यादव कुळात जन्म घेतलेला आणि व्यवसायाने गुराखी असणाऱ्या व्यक्तीला त्याकाळी सर्वदूर पसरलेली वैदिक समाजव्यवस्था आणि वर्णव्यवस्था मान्यता देत नव्हती,त्याची माहिती पुढे आपण घेऊच...
*कृष्णाचे बालपण,समाजव्यवस्था आणि धर्म*
कृष्णाचे नावच मुळात त्याच्या वर्णामुळे कृष्ण असे पडले, दिसायला सावळा पण मोहक कृष्ण मूळ सिंध संस्कृतीत जन्म घेतलेला महत्वाचा महापुरुष,प्राचीन भारतात बौद्ध आणि जैन हे महत्वाचे धर्म मानले जातात, त्यात बौद्ध धर्माची स्थापना गौतम बुद्धांनी इ.स. पूर्व सहाव्या शतकात केली, परंतु कृष्णजन्म इ.स. पूर्व एक हजार वर्षे आधी झाला म्हणूनच त्याआधी सिंध संस्कृतीत असणाऱ्या श्रमणाचा जैन धर्म मला महत्वाचा वाटतो कारण वैदिक आर्य आक्रमण आधी सिंध संस्कृतीत ह्याच धर्माला प्रमुख स्थान दिले गेले,म्हणूनच अजूनही जैन धर्मात कृष्णाला अति महत्वाचे स्थान आहे. दुसरे म्हणजे कृष्णाचे वडील वासुदेव ह्यांनाही जैन धर्मात महत्वाचे स्थान आहे हे "वासुदेव हिन्डी" ह्या महत्वाच्या जैन ग्रंथावरून सिद्ध होते.तो तीर्थंकर अरिठ्ठनेमी (नेमीनाथ) यांचा चुलतभाऊ आहे. जैन साहित्यात कृष्ण हा अर्धचक्रवर्ती आहे, तसेच तो जैन धर्मातील प्राचीन अशा त्रेसष्ठ महापुरुषांपैकी एक आहे. विशेष म्हणजे या त्रेसष्ठ महापुरुषांमध्ये यदुंच्या एकाच घरातले चार लोक आहेत, ते म्हणजे कृष्णाचे वडील वसुदेव, भाऊ बलराम, चुलत भाऊ अरिठ्ठनेमी (नेमीनाथ) आणि स्वत: कृष्ण.
ह्या संस्कृतीने वैदिक आक्रमण कधीच मान्य केले नाही आणि ते कृष्णकाळात अनेक कथांमधूनही सिद्ध होते ,त्यातील सर्वात मुख्य कथा म्हणजेच गोवधर्न पर्वत आणि कृष्ण-इंद्र युद्धाची, इंद्र हा वैदिक धर्माचा मुख्य देव मानला गेला हा तोच देव ज्याला ग्रीक धर्मात झेउस म्हणून ओळखले गेले आणि त्याच आर्यानी अफगाणिस्थान किंवा त्याकाळचे अर्वस्थान सोडून सिंध संस्कृतीत आपले पाय रोवले. तर अशा इंद्र देवाच्या यज्ञ प्रथेला आणि आहुतीला अमान्य करून वैदिक संस्कृतीला कृष्णाने विरोध केला आणि गोवर्धनची म्हणेजच निसर्गपूजेला प्राधान्य दिले.मूळचा गुरे राखणारा प्रत्येक समाजातील स्थरातील कृष्णाचे मित्र हे अगदी सामान्य घरातलेच आणि गावातले होते, तसेच कृष्ण सुदाम्याची मैत्री सर्व प्रचलित आहे.
*कंस वध आणि मथुरा ते द्वारका*
वयाच्या १२-१३ व्य वर्षी कृष्णाने अत्यंत हुशारीने कंसाचा वध केला यादवांच्या मदतीने त्याने पुन्हा एकदा मथुरेची गादी मिळवली आणि उग्रसेन पुन्हा एकदा राज्यावर आला पण हि बातमी जेव्हा जरासंधाला समजली तेव्हा तो द्वेषाने पिसाळून उठला आणि त्याने कौरव आणि पंचालांच्या मदतीने मथुरेवर १७ स्वाऱ्या केल्या, शेवटी नाईलाजाने कृष्ण आणि यादवांना मथुरा सोडून द्वारकेला यावे लागले,पण तरीही जरासंधाने कृष्णाचा पिच्छा पुरवला,आणि हेच मूळ कारण कृष्णाला महाभारतात प्रवेशाचे ठरले.
*महाभारतातील कृष्ण प्रवेश*
मुळात पंडू पुत्र नसणारे पांडव कुंती सोबत हस्तिनापुरात आले आणि त्यांनी कौरवांच्या गादीवर हक्क सांगण्यास सुरुवात केली, भीष्मांनी त्यांना आश्रय आणि शिक्षण दिले, आणि दरबारातील मानकऱ्यांच्या पुढाकारामुळे युधिष्टिराला गादी मिळाली आणि दुर्योधनाच्या हक्काची जागा गेली, पुढे अनेक वेळा आईच्या पदराखाली वाढलेल्या पांडवांना मारण्याचा प्रयत्न झाला,कुंतीला संरक्षण करण्यात यशही आले पण तिला आता पांडवाना तारण्यासाठी कुण्या हुशार चतुर माणसाची गरज भासू लागली, इथेच कृष्ण प्रवेश झाला.हुशार कृष्णाने अचानक द्रौपदी स्वयंवरात पहिला प्रवेश
केला आणि द्रौपदीला बहीण मानले तसेच ५ पांडवांची एकपत्नी होण्याच्या हट्टालाही मान्यता दिली. युधिष्टिर युवराज झाल्यावर कृष्णाने पांडवांबरोबर जवळीक वाढवली,
*(कृष्णाला मुळात द्रौपदी स्वयंवरात कोणत्याही प्रकारचे निमंत्रण नव्हते, त्याचे मुख्य कारण म्हणजे यादव कुळातील किंवा गवळी असणार्या कोणत्याही व्यक्तीला राज गादीवर बसण्याची किंवा राज्य चालवण्याची किंवा इतर राज्यातील राजांनी राजा म्हणून स्वीकारण्याची संमती वैदिक धर्म देत नव्हता, त्याच कारणास्तव कर्णाचा ह्या विवाहात झालेला अपमान सर्वाना माहीत आहे कारण कर्ण स्वतः सारथी पुत्र होता)*
पण केवळ माणूस किंवा द्वारकेचा राजा म्हणून कृष्णाकडे पाहिले तर कृष्ण असे का करत असावा किंवा वरील सर्व प्रयोजन कशासाठी होते,ह्याचा प्रश्न आपल्याला पडतो.त्याचे मुख्य कारण म्हणजे जरासंध आणि त्याची इतर राज्यांबरोबरची मैत्री, त्याच्या पासून द्वारका वाचवणे हे सर्वात मोठे कारन कृष्णाकडे होते, द्वारकेच्या आजूबाजूच्या राज्यांबरोबर जरासंधाचा वाढती मैत्री त्यात शकुनी कौरवांची हस्तिनापूर ,गांधार जिथे शकुनीच भाऊ,मगध जरासंध, चेदी चा शिशुपाल,आसामचा नरकासुर अशा अनेकांबरोबर द्वारकेचे शत्रुत्व झाले होते, आणि त्यांना भेदण्यासाठीच कृष्णाने हस्तिनापूरच्या राजपुत्र आणि कौरव विरोधक पांदनवंबरोबर हाथ मिळवणी केली.तसेच घरचा विरोध म्हणजेच सत्यजित ज्याकडे समान्यक नावांचे रत्न होते आणि तो कृष्ण विरोधी होता त्याचा विरोध कृष्णाने सत्यभामेशी लग्न करून सम्पवला, जरासंधाच्या रुक्मि नगरीच्या राजाला आपली सेने बळकट करण्यासाठी शिशुपालाबरोबर रुक्मिची राजपुत्री म्हणजेच रुक्मिणीशी लग्न लावून देण्याचा प्रस्ताव दिला, तिकडेही चतुराईने रुक्मिणीला पळवून कृष्णाने लग्न केले आणि रुक्मि चा विरोध सम्पला.
असे करत करत कृष्णाने द्वारका,इंद्रप्रस्थ,पांचाळ,ऋक्ष,शल्य अशी अनेक राज्य पांडवांमार्फत आणि स्वतः जोडून एक अभेद्य फळी कौरव,जरासंध आणि इतर शत्रू राज्यांसमोर उभी केली ,पुढे चतुराणीने भीमा मार्फत मल्लयुध्दात जरासंधाचा वध केला नंतर नरकासुराचा वध अचानकपणे आसाम तेव्हाचे प्राग्ज्योतिषपूर गाठून वध केला. ज्याने शत्रुपक्षातील मुख्य माणसे मारून त्यांना युद्ध आधीच कमकुवत केले.
पुढे कृष्णाने पांडवांना राजगादीवर बसण्याआधी अशवमेध यज्ञ करण्यास सांगितला जी कौरवांना खूप मोठी चपराक होती,ह्याच यज्ञांत कृष्णाने पांडवांनी आमंत्रित केलेल्या आणि कट्टर शत्रू असणाऱ्या शिशुपालाचा वध केला,ह्यावेळी स्वतःच्या बुद्धिचातुर्याने आणि यज्ञाचा शस्त्र सैन्य न बाळगण्याचा नियम मोडून शिशुपालाचा त्याच्या मित्र राजांसमोर वध केला आणि भविष्यातील होणाऱ्या युद्धातील मोठा हत्ती कृष्णाने चतुराईने मारला.
शेवटी नीट विचार केला तर आपल्याला समजते महाभारत हे पांडवांना गादी मिळवून देण्यासाठी जरी झाले असले तरी ते कारण दुय्यम आहे अत्यंत चतुराईने कृष्णाने महाभारत विना शस्त्र लढले आणि द्वारकेचे संपूर्ण शत्रू संपवले. आणि यादव कुल वाचवले, पुढे पांडवांचे काय झाले हे सर्वज्ञात आहे, पण त्यापुढे द्वारका मात्र सुरक्षित राज्य झाले द्वारकेचा नाश हा घरच्याच माणसांमुळे मूळे झाला ज्याला कृष्णाने अनेक प्रकारे थांबवण्याचा प्रयत्न केला.
अशाप्रकारे सर्वगुण सम्पन्न,बुद्धिवान,चतुर,सुंदर शासक ज्याने आपले राज्य कसोशीने वाचवले असा श्रीकृष्ण, पुराणांच्या चमत्करांच्या भाकड कथांमध्ये इतका हरवून गेला कि माणूस म्हणून त्याच्याकडे बघण्याची सद्सद्विवेक बुद्धी आपण गमावून बसलो, पण श्रीकृष्णाला पुजायचे तर नक्कीच अगरबत्या किंवा धूपाऱ्यात नाही तर त्याच्या बद्दलची माहिती वाचून त्याच्या अंगीअसणाऱ्या गुण आपण पुजायला हवेत.
व्यतिरिक गोष्टी:
*१) वैदिक साहित्यानुसार यदु हे पंचजनांपैकी एक होते, आणि राजा होण्यास पात्र नव्हते. यदुंपैकी बहुतेक हे जैन धर्माचे अनुयायी होते. कृष्णाचे वडील वसुदेव हे जैन असण्याचीच जास्त शक्यता आहे. ...........यदुंच्या बालेकिल्ल्यांमध्ये जैनांचे सगळ्यात जुने अवशेष सापडतात हा कांही केवळ योगायोग नव्हे.*
*२)जैन धर्मातील प्राचीन अशा त्रेसष्ठ महापुरुषांपैकी कृष्ण एक आहे. विशेष म्हणजे या त्रेसष्ठ महापुरुषांमध्ये यदुंच्या एकाच घरातले चार लोक आहेत, ते म्हणजे कृष्णाचे वडील वसुदेव, भाऊ बलराम, चुलत भाऊ अरिठ्ठनेमी (नेमीनाथ) आणि स्वत: कृष्ण.*
*३)कृष्ण हे महाभारतातील सर्वात महत्वाचे पात्र आहे. महाभारताला एक पवित्र धार्मिक ग्रंथ मानले जाते, पण प्रत्यक्षात ते अनेक दंतकथांचा एक संग्रह आहे. त्यामुळे महाभारताला एखाद्या धर्माचा ग्रंथ मानने चुकीचे आहे. शिवाय महाभारताची रचना शेकडो वर्षांच्या प्रदीर्घ काळात झाली आहे, त्याचाही एक इतिहास आहे. हा ग्रंथ महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या नंतर रचला गेला हे महाभारतातील अनेक उल्लेखांवरून सिद्ध करता येते.*
*४)महाभारत हा मुळात धार्मिक ग्रंथ नसला तरी पुढे वैदिकांनी त्याला एक धार्मिक ग्रंथ बनवण्याचा प्रयत्न केला*
*५)* *भगवतगीता हि बुद्ध आणि महावीरांच्या नंतर १००० वर्षांनी रचली गेली.*
*६)* *मथुरा, शौरीपूर, हस्तिनापुर हे जैनांची प्राचीन ठिकाणे आहेत.यदुंच्या इतिहासातही हीच ठिकाणे महत्वाची आहेत.*
*७)* *सिंध संस्कृतीत मूळ धर्मांत मांसाहार,मद्यपान वर्ज्य होते तेच नंतर वैदिक हिंदू धर्मात आले*
संदर्भ:
Indus Civilization, Rigved and Hindu Culture by P.R. Deshmukh
त्रि षष्ठी शलाका पुरुष : आचार्य शिलांक
हिंदू धर्माचे शैव रहस्य: संजय सोनवणी
#सिंधुस्थान #श्रीकृष्ण #तथ्यमराठी #तथ्य_मराठी #आदर्शवाद. #covid-19 #coronavirus #corona #facemask #2020 #progress #truth #social_distancing #trade_war #sustainability
Comments
Post a Comment