हिरोशिमा ते जादुगोडा बिहार (दुसऱ्या महायुद्धाची सांगता आणि भारतात आजतागायत सुरु असलेले अंतरगत दंड्व)

अनुक्रमे ऑगस्ट ६ आणि ९ १९४५ साली जगात पहिला अणुबॉम्बचा वापर करण्यात आला हल्ल्याची भीषणता म्हणा किंवा नंतर वाटलेला खजीलपणा म्हणा पण अमेरिकेने त्यांच्या बाजूने युद्ध संपवले,इतर देशहि भरपूर वित्तहानी,जीवितहानी झाल्यानंतर संहार तृप्तीची ढेकर देऊन शांत झाले, आपसूकच महायुध्दा आधी काही बलवान देशांना धूळ चारल्यानंतर अमेरिका विश्व् विजेता ठरला होता, जपान सोबतच जर्मनीचा नाझीवाद मोडीत निघाला आणि इटालियन देशांची भरपूर हानी झाली,एकूण ७३०००००० लोकांचे प्राण घेऊन हे युद्ध आजच्याच दिवशी संपले होते.
त्यानंतर राष्ट्र संघ विलीन होऊन संयुक्त राष्ट्राचा उदय झाला आणि महाशक्तीच्या रूपात संयुक्त राष्ट्र आणि सोवियत संघ सर्व जगावर राज्य करण्यास तयार झाले,वरून सर्व आटोक्यात आणि शांत जरी वाटत असले तरी अमेरिकेला अणुअस्त्र वापरल्याने हिरोशिमा आणि नागासाकीचे बळी आणि भीषणता शांत बसू देत नव्हती त्याच साठी अणुअस्त्र बंदी करार करण्यात आला आणि शीतयुद्धाचे पर्व सुरु झाले ते आजतागायत सुरूच आहे. अणुअस्त्रांच्या संशोधनात अमेरिकेबरोबरीने इंग्लंड,फ्रांस,चीन,सोवियत संघ सामील झाले आणि पुन्हा एकदा १९८० पर्यंत संपूर्ण जगाला ५० वेळा क्षणात संपवू शकतील इतकी अस्त्रे निर्माण झाली.
त्याचवेळी नुकताच स्वतंत्र झालेला भारत १९४८ ला गांधी हत्येने पुन्हा हादरला आणि नंतर नेहेरुंच्या नेतृत्वात सुरु झालेली वाटचाल १९६२ ला चीन युद्धाने थबकली.१९७४ साली इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली भारताने पोखरण इथे पहिली अनुअस्त्र चाचणी चाचणी घेतली आणि १९८४ ला त्यांची हत्या झाली, पण पुन्हा एकदा महात्म्याच्या देशात न्यूक्लिअर नॅशनलिझम चे वारे वाहू लागले.अमेरिकेने अणुअस्त्र संशोधनावर बंदी आणली त्यात आणि सर्व हक्क स्वतःपुरते राखून घेतले,पण हे वारे १९९८ साली बुद्धपूर्णिमेला पुन्हा एकदा वाहिले आणि अहिंसावादी बुद्ध विनाशकारी अनु अस्त्र चाचणीच्या यशाने हसला. (budha is smiling ).
१९९८ ला पुन्हा एकदा भारतीयांना चघळण्यासाठी अटल सरकारने नवा मुद्दा दिला होता, जगापासून लपवून जवळ जवळ तीन अस्त्रांची चाचणी पोखरणला करण्यात आली होती ती इतकी गुपित ठेवण्यात आली होती कि जवळील गावांनाही त्याची माहिती नव्हती,लष्कर संशोधक हे गावातल्या लोकांच्या वेषातच फिरत.चाचणी घेण्याच्या दिवशी अचानक लष्कराची गाडी गावांत शिरून लोकांना घरात बसण्यास सांगत होती.पण आपणही फक्त इतक्यावरच थांबलो नाही.
अटलजीनि लाल बहादूर शास्त्रींचा "जय जवान जय किसान" नार्याला जोडून "जय विज्ञानाची" भर दिली आणि विज्ञानाच्या नावाने अनुस्त्रांचे वारे आणि संख्या वाढवण्यासाठी युरेनियमच्या खाणींवर मोठ्या प्रमाणात खनन होऊ लागले. जादुगोडा,बिहार मधील असेच एक गाव जे केवळ युरेनियम च्या खाणींपासून १ किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथले अनेक रहिवासी युरेनियम रेडिएशन चे शिकार झाले आहेत, बहुतेक जण ऍक्युट मायलोईड ल्युकेमिया चे शिकार झालेले आढळून येतात,गावातील पिण्याच्या पाण्या पासून तर दगड जमिनीपर्यंत,पिकांमध्ये ह्या रेडिएशन चा प्रभाव जाणवतो,गावातील खाणीत काम करणारे बहुतेक लोक तांब्यापासून युरेनियम बाजूला करण्याचे काम करतात,वर वर ग्रामीण विकास आणि संधी वाटणारी ह्या खाणींचे भयानक वास्तव म्हणजे गावातील लोकांची पिढी विकलांग,मतिमंद जन्माला येऊ लागलीय, आजूबाजूला वसलेल्या आदिवासींना जी पहिली आदिवासी कल्याण योजना वाटलीय ती त्यांच्यासाठी नाही तर खाण मालक आणि अणुशक्ती होऊ पाहणाऱ्या त्यांच्या राष्ट्रासाठी आहे, ज्यात त्यांचे योगदान म्हणजे त्याचा जीव आहे, आज हे आदिवासी जेव्हाही ह्या युरेनियम रेडिएशन उत्सर्गाबाबत आंदोलने करतात तर आजच्या नव्या राष्ट्रभक्तीच्या व्याखे प्रमाणे त्यांना देशद्रोही समजले जाते,खुद्द होमीभाभा संशोधनातील शास्त्रज्ञ हे मान्य करण्यास तयार नाहीत उलट ह्या गोष्टींवर पांघरून घालणे त्यांना सोईचे वाटते.
आज देशात कट्टरवाद,दैवीकरणाची, शास्त्र आणि शस्त्राची अशी काही भेसळ करून देशभक्तीची नवी व्यख्या भारतीयांनी आत्मसात केली आहे कि त्यात मुळात जवान,किसान,आदिवासी किंवा ग्रामीण ह्यांना जागाच नाही, विज्ञानाची कास धरून युरेनियम बेरोजगार उपेक्षितांकडून खणले जातेय आणि शिक्षित बेरोजगारांना जिओ चा अनलिमिटेड पॅक देऊन त्यातून देशभक्तीच्या भेसळीचे बाळकडू पाजून जगवले जातेय, पैशाचं केंद्रीकरण इतके झालेय कि अंबानी जगात ४था श्रीमंत बनलाय.
शेवटी हि सत्तेची हाव हि फक्त भारतालाच नाही तर इतर देशांनाही आहेच पण प्रत्येकाने तेथील सामान्यांना केव्हाच वगळले आहे, हे युद्ध फक्त प्रत्येक देशातील मोठ्यांसाठीच आहे ज्यात सामान्यांच्या भावनांचा कायम खेळ होत राहील आणि जीवही जात राहतील.
-विशाल यशवंत फटांगरे
Comments
Post a Comment