गणपतीतील "ती"

 (गणपतीची प्रतिष्ठापना करण्याआधी नक्की वाचा)

महाराष्ट्रात अतिशय भक्तिभावाने गणेश उसत्व साजरा होतो,आपण घरातला बाप्पा घेण्यापासून तर मंडळाचं बाप्पाचं रूप कसं असावं ह्या बद्दल खडा न खडा माहिती पुस्तकाणतून गोळा करतो आणि बाप्पाचं मंगलमय रूप घरात आणतो,मग उस्फुर्तपणे प्रतिष्ठापणा करून आरती ,अथर्वशीर्ष पठण करून बाप्पाने आपल्याला आशीर्वाद द्यावा अस मागणं घालतो.

पण खरंच गणपती फक्त अथर्वशीर्ष म्हणण्याइतकाच आहे का,त्याची वृद्धी किती आहे त्याची आपल्याशी नाळ किती खोलवर रुजलेली आहे ह्याची पडताळणी व्हायला हवी त्यासाठी आजचा लेख.

आपल्या विशाल संस्कृतीला पूर्वी पासून लाभलेला शाप म्हणजे तथाकथित देवी देवतांच्या, सूर असुरांच्या, चमत्काराच्या गोष्टी ज्या ऐकायला इतक्या सुंदर वाटतात पण त्या आपल्या तर्क विवेक बुद्धीला तितक्याच मारक ठरतात मग आपण त्यापुढची शोधा शोध कवचिततच करतो,"गणपतीचं" ही तसं झालं,पार्वतीच्या मळापासून बनलेला,साक्षात महादेवाला नडलेला असा गणपती, पण जेव्हा आपण आपल्या मूळ संस्कृतीचा शोध घेतो तेव्हा आपल्याला समजते की आज पितृसत्ताक असणारी आपली सिंध संस्कृती त्याकाळी स्त्रीसत्ताक होती,अशी संस्कृती जी महादेवाला निसर्गाला पूजणारी आणि कबिलयांमध्ये राहणारी,स्वतःला "गण"म्हणून संबोधणारी "स्त्री सत्ताक" संस्कृती. त्यावेळी स्त्रीची ओळख ही घर तसेच स्वतःचा कबिला किंवा समहू सांभाळणारी म्हणूनच होता.स्त्री घर मुले आणि कबिल्याचे रक्षण करत असे तर पुरुष स्त्री ला पूज्य स्थानी ठेऊन पूजन करत असे,पुरुष मुख्यत्वे शेती,व्यापार ह्यात लक्ष घाली.
ह्या प्रत्येक कबिल्याचे स्वतःचे असे प्रतीके असत अशी प्रतीके जी प्राणी,पक्षी ह्यांचे आकार किंवा रूपे असत,ह्याच प्रतिकांचे मुखवटे परिधान करून "स्त्री" आपल्या कबिल्याचे रक्षण करी, वेळ आली तर त्यासाठी ती युद्धही करत असे,ह्या युद्धातील रोचक तथ्य म्हणजे जेव्हा एखादा कबिला दुसऱ्या कबिल्याचा पराभव करत असे तेव्हा त्या कबिल्याचे प्रतीक विजयी कबिल्याचे वाहन किंवा सेवेकरी होतं असे,मग विजयी कबिल्याची स्त्री मुखवटा परिधान करून विजयी मिरवणूक किंवा विजयाचा उत्सव करी.त्यात सिंध संस्कृतीत गजाला विशेषकरून पुजलेले आढळते,कदाचित ह्याच गजमुखाचा मुखवटा धारण केलेल्या कबिल्याने एखाद्या मूषक प्रतीक असलेल्या कबिल्याचा पराजय झाला असावा आणि मूषक हे त्याचे वाहन झाले असावे,ह्याचे आणखी पुरावे द्यायचे झाले तर हिंदू संस्कृतीतील बऱ्याच देवींना आपण वाहनावर आरुढ असल्याचे बघतो, आता खरंच कोणतीही स्त्री किंवा पुरुष मूषकावर किंवा कोणत्याही हिंस्त्र श्वापदावर बसू शकत नाही ही गोष्ट आपण दैविक चमत्काराची पुटं बाजूला सारली तर स्पष्ट होते.सांगायचं एकचं हीच ती स्त्री जिने असे बरेच मुखवटे परिधान करून आपल्या गणाच्या रक्षनासाठी "गणपती" होऊन "स्त्री सत्ताक" संस्कृतीचे पुरावे दिले.
ह्याच विजयाच्या गाथा परंपरागत पद्धतीने पिध्यान्पिढ्या गोष्टींद्वारे किंवा चित्रांद्वारे जतन केला जाई.आजही आदिवासी ह्या प्रथा गोष्टी मुखवटे घालून किंवा गोष्टींतून सांगतात.

पण काळ जसा पुढे सरकला तशी ह्या गोष्टींवर पितृसत्ताक संस्कृतीचे आणि पुरुषी रूपातील देवांचे पुरांनामधून आक्रमण झाले,ह्यात गणपतीच्या मुखवट्यातील "ती" ची जागा "त्याने"(पुरुषाने) घेतली,असेच अनेक रूप बदलली गेली,पितृसत्ताक पुराणातील कथा ,चमत्काराच्या गोष्टीत आपण नकळत इतके रमून गेलो की आपण आपल्या पूर्वजांचा शोध किंवा संस्कृती जाणण्याचा प्रयत्नही केला नाही.

एकेकाळी असणारी "स्त्रीसत्ताक"संस्कृती एखाद्या अस्थित्वच नसलेल्या गोष्टी सारखी लयाला गेली,आजही आपण डौलाने गणपती बसवू त्याची मनोभावे पूजा करू पण त्याच्यात दडलेल्या त्या अथांग "ती" चा खरंच शोध घेऊ का?

-विशाल यशवंत फटांगरे 
(तथ्य मराठी) #सिंधुस्थान #स्त्री #today #2020 #ganesh_chaturthi #maharashtra #history #culture

Comments

Popular posts from this blog

माणूस खरंच पृथ्वीवर उपरा आहे का?

तिजा तेरा रंग था मै जो।