डावा left handers day special


 

डावा ह्या शब्दात खूप कमी लोकांना आपलेपणा सापडतो, त्यातला मी एकजण,जगातल्या लोकसंख्येच्या कितीतरी कमी प्रमाणात असणारे हे डावंखुरे,ह्यातच सुरुवाती पासून कमीपणा...

की आपण इतरांप्रमाणे उजवे का नाही? हा विचार कायम यायचा,कदाचित प्रत्येक डांवखुऱ्याच्या मनात एकदातरी आलाच असणार.

तसे माझ्या घरातील वातावरण कायम पुरोगामी विचारांना प्राधान्य देणारे असल्याने,वडील मराठीचे शिक्षक त्यात स्वतः डावंखुरे असल्याने घरातून मला हात बदलावा असा दबाव कधीच आला नाही,पण समाजात वावरताना बऱ्याचवेळा ह्या डावखुऱ्या हाताचा त्रास झाला,प्रसाद घेताना,लहानपणी पंगतीत वाढण्याच्या हौस पुरी करताना,काहींनी तर खालच्या स्तरावर जाऊन रोखठोक विचारलेही खायचा अन धुवायचा हात एकचं का? पण एकदाही कोणी ही पर्वा मात्र केली नाही की लहानमुलावर ह्या गोष्टींचे वाईट परिणाम होऊ शकतात किंवा तो स्वतःचा आत्मविश्वासही गमावू शकतो.त्यात जर डावखुऱ्या हाताची मुलगी असेन तर अवघडच,मी इथपर्यंत ऐकलंय की हात बदलावा म्हणून लोक मुलांच्या डाव्या हाताला चटका देने,किंवा तो बांधून ठेवणे असे प्रकार करतात,त्याला ना फोटोतले देव डाव्या हाताने आशीर्वाद देताना दिसतात ना आजूबाजूचे समदुखी लवकर भेटतात.पण ह्यातून कसेबसे आम्ही डावंखुरे सावरतो,

मग हा डावखुरा आपल्यासारखी असणारी आणखी कोणती माणसे जगात आहे का? हे शोधण्याचा अथक प्रयत्न करतो तशी त्याला माणसे भेटतातही,अगदी मोठयतल्या मोठ्या व्यक्तिमत्वांपासून तर स्वत:पर्यत सर्व सापडतात,
पण ह्या शोधात त्याला तो स्वतः ही सापडतो कदाचित...
आज उजवे डावे हे आपल्या समाजव्यवस्थेत पण आढळतात, असे डावे ज्यांची घरं कायम नाली-नद्यांच्या कडेला,म्हसनवाट्या जवळ,गावा गल्लीबाहेर दिसली,अख्या गावाची घाण साफ करणारे हे डावे माझ्यासारखेच अनेकदा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पणे कायम हिनवले गेले,जसा लोकांना डावा हात कधीच चालला नाही तशीच ही माणसंही सहन झाली नाही, 
कदाचित डावखुरा हात स्वतः ची घाण साफ करायला हे उजवे वापरायचे,त्याच अनुषंगाने ह्यांनाही डावे असे नाव पडले असावे.पण ह्यांची साथ अनेक थोर विचारवंतांनी दिली,त्यांना मारून त्यांची विचारसरणी संपवण्याचा केविलवाणा निश्फळ प्रयत्न उजव्यानि केला,पण 
ह्या उजव्यांना एक गोष्ट कधीच कळली नाही ती समानतेची,डावा-उजवा,काळा-पांढरा, उच्च-नीच करता करता त्यांनी शरीरातील अवयवनाही ह्या संज्ञा लागू केल्या,शरीरखालील भाग हा घाण किंवा शूद्र,नीच असे ठरवून ते मोकळे झाले आणि मनुष्य नामक निर्माण झालेल्या सुंदर कालाकृतीलही त्यांनी बाटवले, पण अशीच साम्य राखणारी समाजिक स्थिती ही आहे, माणसापेक्षा देवाला,धर्माला,रंगाला देण्यात आलेलं महत्व आणि त्यांची कत्तल करणारे उजवे हात असेच भेद करताना उंचावत राहिले.तर आपल्या समाजाची डावी बाजू कायमची प्यारालाईझ होऊन जाईल हे नक्की!

सांगायचं एकच डाव्यांनी कायम समाजाला प्रतिभावन्त डावखुरे दिलेत आणि देत राहतील,पण उजव्यांची अवस्था त्या शिंगावर गर्व आणि पायावर द्वेष करणाऱ्या हरणासारखी नको व्हायला,की ज्याचे सुंदर शिंग काट्यात अडकतात तेव्हा शूद्र पाय बाहेर पडायला झटत असतात पण नाईलाजाने त्याची शिकार होते.
बाकी मी डावखुराच राहणार आणि माणूसही!

-विशाल यशवंत फटांगरे

#lefty #left_handers_day #today #india #history #marathi

Comments

Popular posts from this blog

माणूस खरंच पृथ्वीवर उपरा आहे का?

तिजा तेरा रंग था मै जो।