गणपतीतील "ती"
(गणपतीची प्रतिष्ठापना करण्याआधी नक्की वाचा) महाराष्ट्रात अतिशय भक्तिभावाने गणेश उसत्व साजरा होतो,आपण घरातला बाप्पा घेण्यापासून तर मंडळाचं बाप्पाचं रूप कसं असावं ह्या बद्दल खडा न खडा माहिती पुस्तकाणतून गोळा करतो आणि बाप्पाचं मंगलमय रूप घरात आणतो,मग उस्फुर्तपणे प्रतिष्ठापणा करून आरती ,अथर्वशीर्ष पठण करून बाप्पाने आपल्याला आशीर्वाद द्यावा अस मागणं घालतो. पण खरंच गणपती फक्त अथर्वशीर्ष म्हणण्याइतकाच आहे का,त्याची वृद्धी किती आहे त्याची आपल्याशी नाळ किती खोलवर रुजलेली आहे ह्याची पडताळणी व्हायला हवी त्यासाठी आजचा लेख. आपल्या विशाल संस्कृतीला पूर्वी पासून लाभलेला शाप म्हणजे तथाकथित देवी देवतांच्या, सूर असुरांच्या, चमत्काराच्या गोष्टी ज्या ऐकायला इतक्या सुंदर वाटतात पण त्या आपल्या तर्क विवेक बुद्धीला तितक्याच मारक ठरतात मग आपण त्यापुढची शोधा शोध कवचिततच करतो,"गणपतीचं" ही तसं झालं,पार्वतीच्या मळापासून बनलेला,साक्षात महादेवाला नडलेला असा गणपती, पण जेव्हा आपण आपल्या मूळ संस्कृतीचा शोध घेतो तेव्हा आपल्याला समजते की आज पितृसत्ताक असणारी आपली सिंध संस्कृती त्याकाळी स्त्रीसत्ताक होती,अशी स...