Posts

Image
  संस्कृती : जी स्वतःची सर्वश्रेष्ठ आणि दुसऱ्यांची निंदनीय असते मध्यमवर्गीय माणूस, ह्या प्राण्याचे प्रमाण भारतात सर्वात जास्त, सर्वात जास्त टॅक्स भरणारा,सर्वात मोठी वोट बँक असणारा,सर्व नियम अटी लागू होणारा, सर्वात जास्त इज्जत प्यारी असणारा, सर्वात जास्त धार्मिक,भोळा भाबडा ज्याला वेळ येईल तसे देशातील सरकार किंवा श्रीमंत वरील कोणतीही गोष्ट लादून त्यांची कामे काढून घेतात, ह्या प्राण्याला आणि त्याच्या मुलं बाळांना सर्वच नियम लागू होतात अगदी कपडे घालण्यापासून, एवढे सगळे नियम असतानाही संस्कृतीचा फोल माज त्याचा काही उतरत नाही, आणि ती जपायची सर्वात मोठी मक्तेदारी ह्याने घेतलेली असते, त्यात राजकारणी,संघ संघटना धर्म जातीचं विष कालवून एखादवेळी दंगलीहि घडवून आणतात,ह्यात मारली जाणारी किंवा गुन्हे करणारी पोरही ह्यांचीच पण ह्यांना तो ह्यांची संस्कृती जपल्याचा एक पराक्रम वाटतो. जाऊद्या मूळ विषयाला हात घालू...                                                       लह...

दसऱ्याची आठवण

  मागच्या दसऱ्याला माझ्या वकील मित्राने त्यादिवशी जिंकलेली केस सांगितली तीच सांगतोय... काही वर्षांपूर्वी वकिलाच्या एका मित्राने प्रेमविवाह केला,मुलगीही सुंदर सुशील चांगली होती त्यामुळं घरच्यांनीही लगेच होकार दिला पण लग्नाच्या संध्याकाळीच मुलीचे काही अज्ञातांनी अपहरण केले,मुली मुलाच्या घरचे अत्यंत चिंतेत होते,अपहरण करूनही खंडणी किंवा इतर काही मागणीचा साधा फोनही त्यांना आला नाही त्यामुळं प्रत्येकाच्या मनात एका वेगळ्याच भीतीने घर केले,संध्याकाळ पर्यंत कसे बसे मित्र वकिलाच्या सांगण्यावरून त्यांनी वाट पाहिली पण नंतर ते पोलिसात तक्रार करण्यासाठी गेले पोलिसांनी तक्रार फक्त लिहून घेतली आणि माहिती भेटल्यास सांगतो असं बोलून काम संपवलं,वकिलाला समजून चुकलं काहीतरी दिल्या घेतल्या शिवाय चौकशी पुढं सरकणार नाही,वकिलाचा मित्र प्रामाणिक असल्याने तो बरेच दिवस चौकीत खेटे घालत राहिला पण थंड पोलीस यंत्रणा झोपलेलीच राहिली शेवटी पैशाची तजबीज करून चौकशी सुरू केली.अचानक... एक दिवस वकिलाच्या मित्राचा मोबाईल वाजला आणि समोरून त्याची पत्नी बोलत होती,तिने जो प्रकार सांगितले ते ऐकून मित्राला धक्काच बसला,तिने सांग...

ll निःशेष ll

  ll निःशेष ll मै सत्य बात बोलू तो गाली l तु गाली भी दो तो सुभाषित है ll तु मूत्र को पवित्र बोलो तो प्राशित है l मै पाणी को छु लु तो ग्रासित है ll तु भगवान का धंदा करो तो पुण्य l मै भुके पेट रोटी चुराऊ तो शासित है ll तु गंदगी करे तो भी पूज्य है l मै उठाऊ फिर भी तुच्छ हैll तू राजा का बेटा तुने हक से लिया शिक्षण l मै सारथी का कर्ण,करू बराबरी तो शासन है ll तु कुछ लिखो तो कहलाते पंडित l मै सिखु- लिखु तो,क्यू होता धर्म खंडित ये ll मै आगे बढू तो क्यू होता क्रुद्ध तू l मुझे मालूम तेरे नजर मे,मै क्षुद्र हु ll अरे सिखने दे मुझे करणे दे सिद्ध तू l करना फिर बराबरी समज आयेगा,मै भी बुद्ध हु ll एक ही माँ हम दोनो कि,कभी उसने ना किया भेद l फिर क्यू मेरे नाम से पैदा होता तेरे मन मे मतभेद है ll मुरदे गाडू,हल चलाऊ,कचरा उठाऊ इस समाजमंदिर का मै चक्र चलाऊ l ताकद मुझमे भी है इतनी इस मंदिर का कलश हिलाऊ ll प्यार से देख दुनिया,ना प्यार कभी आरक्षित हैl खुद के अंदर झाक पगले, तू ही जातीभेद से ग्रासित है ll इतनी ना दे गाली,मत कर इतना द्वेष l मान बदलती हवा को,नहीं तो कुछ ना रहेगा तेरा शेष ll - विशाल यशवंत फटांगर...

गणपतीतील "ती"

  (गणपतीची प्रतिष्ठापना करण्याआधी नक्की वाचा) महाराष्ट्रात अतिशय भक्तिभावाने गणेश उसत्व साजरा होतो,आपण घरातला बाप्पा घेण्यापासून तर मंडळाचं बाप्पाचं रूप कसं असावं ह्या बद्दल खडा न खडा माहिती पुस्तकाणतून गोळा करतो आणि बाप्पाचं मंगलमय रूप घरात आणतो,मग उस्फुर्तपणे प्रतिष्ठापणा करून आरती ,अथर्वशीर्ष पठण करून बाप्पाने आपल्याला आशीर्वाद द्यावा अस मागणं घालतो. पण खरंच गणपती फक्त अथर्वशीर्ष म्हणण्याइतकाच आहे का,त्याची वृद्धी किती आहे त्याची आपल्याशी नाळ किती खोलवर रुजलेली आहे ह्याची पडताळणी व्हायला हवी त्यासाठी आजचा लेख. आपल्या विशाल संस्कृतीला पूर्वी पासून लाभलेला शाप म्हणजे तथाकथित देवी देवतांच्या, सूर असुरांच्या, चमत्काराच्या गोष्टी ज्या ऐकायला इतक्या सुंदर वाटतात पण त्या आपल्या तर्क विवेक बुद्धीला तितक्याच मारक ठरतात मग आपण त्यापुढची शोधा शोध कवचिततच करतो,"गणपतीचं" ही तसं झालं,पार्वतीच्या मळापासून बनलेला,साक्षात महादेवाला नडलेला असा गणपती, पण जेव्हा आपण आपल्या मूळ संस्कृतीचा शोध घेतो तेव्हा आपल्याला समजते की आज पितृसत्ताक असणारी आपली सिंध संस्कृती त्याकाळी स्त्रीसत्ताक होती,अशी स...

माणूस खरंच पृथ्वीवर उपरा आहे का?

Image
  ३ वर्षांपूर्वी प्राध्यापक डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी यांचं व्हॉन डेनिकेनच्या अफाट संशोधनाचा मागोवा घेणारं हे पुस्तक हाती लागलं होतं.पुस्तक छोटे जरी असले तरी मानवाच्या अनैसर्गिक निर्मितीचे प्रचंड पुरावे ह्या पुस्तकात मिळतात.पुस्तकात मांडलेल्या गोष्टी जेवढ्या आस्चर्यकारक आहेत तेवढ्याच तर्कशुद्धहि. पुस्तक वाचल्यावर नक्कीच आपल्या मनात मानवजाती बद्दलचे, आपल्या निर्मितीचे असंख्य प्रश्न उभे राहतात. संध्याकाळी खिडकीतून बाहेर डोकावताना मनात विचार येतो…. सकाळी होणारी चिमण्यांची चिव चिव, दुपारी झाडांच्या सावलीत पहुडलेले जनावरं,संध्याकाळी आकाशात भरारी घेणारे थवे दिसतात, आज फक्त माणूस घरात आहे.कारण बाहेरची दूषित हवा,आज पुन्हा एकदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हाच प्रश्न पुन्हा पडलाय कि खरंच मनुष्य इथलाच का? किंवा आपली उत्क्रांती आणि प्रगती इथेच झाली का?अगदी लहानपानपासून आपण वाचत आलो कि माणूस माकडापासून आणि हे माकड पाण्यातल्या अमिब्यापासून बनले आणि मग इतकी मोठी प्रगती करत करत आपण आज इतकी प्रगती केली कि कोरोनाच्या विळख्यात अडकून पडलो आणि पुन्हा एकदा आपल्या उत्क्रांती आणि प्रगतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिल...

हिरोशिमा ते जादुगोडा बिहार (दुसऱ्या महायुद्धाची सांगता आणि भारतात आजतागायत सुरु असलेले अंतरगत दंड्व)

Image
  अनुक्रमे  ऑगस्ट ६ आणि ९ १९४५  साली जगात पहिला अणुबॉम्बचा वापर करण्यात आला हल्ल्याची भीषणता म्हणा किंवा नंतर वाटलेला खजीलपणा म्हणा पण अमेरिकेने त्यांच्या बाजूने युद्ध संपवले,इतर देशहि भरपूर वित्तहानी,जीवितहानी झाल्यानंतर संहार तृप्तीची ढेकर देऊन शांत झाले, आपसूकच महायुध्दा आधी काही बलवान देशांना धूळ चारल्यानंतर अमेरिका विश्व् विजेता ठरला होता, जपान सोबतच जर्मनीचा नाझीवाद मोडीत निघाला आणि इटालियन देशांची भरपूर हानी झाली,एकूण ७३०००००० लोकांचे प्राण घेऊन हे युद्ध आजच्याच दिवशी संपले होते.                                                           त्यानंतर राष्ट्र संघ विलीन होऊन संयुक्त राष्ट्राचा उदय झाला आणि महाशक्तीच्या रूपात संयुक्त राष्ट्र आणि सोवियत संघ सर्व जगावर राज्य करण्यास तयार झाले,वरून सर्व आटोक्यात आणि शांत जरी वाटत असले तरी अमेरिकेला अणुअस्त्र वापरल्याने हिरोशिमा आणि नागासाकीचे बळी आणि भीषणता शांत बसू देत नव्हती त्याच ...

डावा left handers day special

Image
  डावा ह्या शब्दात खूप कमी लोकांना आपलेपणा सापडतो, त्यातला मी एकजण,जगातल्या लोकसंख्येच्या कितीतरी कमी प्रमाणात असणारे हे डावंखुरे,ह्यातच सुरुवाती पासून कमीपणा... की आपण इतरांप्रमाणे उजवे का नाही?  हा विचार कायम यायचा,कदाचित प्रत्येक डांवखुऱ्याच्या मनात एकदातरी आलाच असणार. तसे माझ्या घरातील वातावरण कायम पुरोगामी विचारांना प्राधान्य देणारे असल्याने,वडील मराठीचे शिक्षक त्यात स्वतः डावंखुरे असल्याने घरातून मला हात बदलावा असा दबाव कधीच आला नाही,पण समाजात वावरताना बऱ्याचवेळा ह्या डावखुऱ्या हाताचा त्रास झाला,प्रसाद घेताना,लहानपणी पंगतीत वाढण्याच्या हौस पुरी करताना,काहींनी तर खालच्या स्तरावर जाऊन रोखठोक विचारलेही खायचा अन धुवायचा हात एकचं का? पण एकदाही कोणी ही पर्वा मात्र केली नाही की लहानमुलावर ह्या गोष्टींचे वाईट परिणाम होऊ शकतात किंवा तो स्वतःचा आत्मविश्वासही गमावू शकतो.त्यात जर डावखुऱ्या हाताची मुलगी असेन तर अवघडच,मी इथपर्यंत ऐकलंय की हात बदलावा म्हणून लोक मुलांच्या डाव्या हाताला चटका देने,किंवा तो बांधून ठेवणे असे प्रकार करतात,त्याला ना फोटोतले देव डाव्या हाताने आशीर्वाद देत...